Know about Donald trump's daughter ivanka trump fitness secrets myb
३ मुलं होऊनही इवांकाने कसं ठेवलयं स्वतःला फिट, जाणून घ्या तिच्या फिटनेसचं सिक्रेट..... By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 10:35 AM2020-02-26T10:35:47+5:302020-02-26T11:03:05+5:30Join usJoin usNext अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांची पत्नी आणि मुलगी इवांका हिच्यासोबत भारत दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान ट्रम्प यांची मुलगी इवांका ही चर्चेत होती. इवांका ही तिच्या लुकमुळे ड्रेसिंगमुळे सगळ्याचं लक्ष वेधत होती. तीन मुलं असून सुद्धा इवांका फीट आहे. तुम्ही विचार करत असाल इवांकाने स्वतःला इतकं फिट कसं ठेवलं आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे इवांकाच्या फिटनेसचं रहस्य. स्वतःला फिट ठेवण्यासाठी इवांका आपलं डाएट आणि व्यायाम यांवर लक्ष देते. ज्या स्त्रिया असं समजतात की लग्न झाल्यानंतर स्वतःकडे लक्ष देणं कठीण असतं आणि आपण जाडं होतो. इवांका अशा अनेक गृहीणींसाठी उत्तम उदाहरण आहे. इवांकाने मुलं झाल्यानंतर १३ किलोपेक्षा जास्त वजन कमी करण्यासाठी स्पिन क्लासेस घेतले. सर्वसाधारणपणे इवांका २० मिनिट ग्रिलिंग वर्कआऊट करते. त्यांच्या रूटीनमध्ये प्रामुख्याने योगा आणि वेगवेगळ्या व्यायाम प्रकारांचा समावेश असतो. इवांकाने सोशल मीडियावर आपल्या वर्कआऊटचे व्हिडीओ सुद्धा टाकले आहेत. इवांका आपल्या डाएटमध्ये हिरव्या भाज्या, सॅलॅड आणि प्रोटीन्सचा समावेश करते. ओट्स. कार्बोहायड्रेट्स यांचा समावेश असतो. इवांका आपल्या दिवसाची सुरूवात एक ग्लास लिंबू पाणी पिऊन करते. आहरात ब्लूबेरी, रास्पबेरी यांसोबत ग्रीक योगर्ट घेण्यास प्राधान्य देते. इवांका ड्राई फ्रूट्स, नट्स आणि बीयांचा आपल्या आहारात समावेश करते. स्वतःला सुंदर ठेवण्यासाठी इवांका जास्तीत जास्त पाणी पिते. ज्यामुळे तिची त्वचा ग्लोईंग दिसते. कारण शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी इवांका जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला सुद्धा इवांकाप्रमाणे सुंदर दिसायचं असेल तर इवांकाच्या फिटनेस टिप्स फॉलो करून तुम्ही स्वतःला मेंटेन ठेवू शकता. टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यFitness TipsHealth