know the benefits of curry leaves
वजन कमी करण्यासोबतच त्वचेला आणि केसांना फायदेशीर कढीपत्ता, जाणून घ्या फायदे By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 05:46 PM2020-01-27T17:46:06+5:302020-01-27T17:57:55+5:30Join usJoin usNext आपण आजार असू तर घरगुती उपाय करण्यापेक्षा दवाखान्यात जास्त जात असतो. कारण आपल्याला लवकर बरं व्हायचं असतं. पण तुम्हाला माहीत आहे. का घरगुती वापरात असलेल्या काही पदार्थाचा वापर करून तुम्ही स्वतःला आजारी पडण्यापासून वाचवू शकता. कढीपत्ता हा पदार्थ नेहमीच आपल्या आहारात वापरला जात असतो. याचे फायदे सुद्धा अनेक आहेत. आज आम्ही तुम्हाला कढीपत्त्याच्या सेवनाचे फायदे सांगणार आहोत. कढीपत्त्याच्या पानांच्या सेवनाने मधुमेह हा आजारही कमी होतो. नियमितपणे ही पाने खाल्ल्यास रक्तातील वाढलेल्या साखरेचे प्रमाण कमी होऊन योग्य प्रमाणात होते. जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल आणि तुम्हाला कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्ही अगदी आवर्जून कढीपत्ता आहारात समाविष्ट करायला हवा. कारण त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहू शकते. जुलाब व उलटी होत असेल व काही वेळा त्यातून रक्त पडत असेल तर कढीपत्त्याची पाने पाण्यासोबत वाटून ते पाणी गाळून घ्यावे व १-१ चमचा या प्रमाणात २-३ तासांच्या अंतराने प्यावे. केसांसाठी सुद्धा कढीपत्ता फायदेशीर आहे. त्यासाठी कढीपत्त्याची पानं बारीक करून पेस्ट बनवा. त्यात थोडं दही घालून केसांना लावा. आता केस २०-२५ मिनीटं तसेच ठेवा, नंतर शॅम्पूनं केस धुवा. असं नेहमी केल्यानं केस काळे आणि दाट होतात. जर तुम्हाला पिंपल्स येऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही कढीपत्त्याचा चहा करुन पिऊ शकता. रक्तशुद्धीकरणासाठी कढीपत्ता चांगला असून अगदी ग्रीन टी प्रमाणेच तुम्हाला कढीपत्ता टी बनवायचा आहे. वजन वाढत असेल तर कढीपत्ता तुम्हाला वजन कमी करायला मदत करु शकतो. वजन कमी करण्याचा तुमचा विचार असेल तर तुमच्या डाएटमध्ये कढीपत्त्याचाही समावेश करा कारण त्याचा तुम्हाला अधिक फायदा होऊ शकेल. तुमच्या डाएटसोबत योग्य गोष्ट तुमच्या पोटात जाईल.तुमच्या आरोग्याच्या सगळ्या तक्रारी दूर ठेवायच्या असतील तर तुम्ही कढीपत्ता खावा. आजारांशी लढण्याची ताकद तुम्हाला कढीपत्ता खाल्ल्यामुळे मिळेल. टॅग्स :हेल्थ टिप्सब्यूटी टिप्सHealth TipsBeauty Tips