know how to be cool while anger get excessive by using Salman khan's method
राग जास्त येतो का? मग सलमानचा हा फंडा वापरून स्वतःला ठेवा कूल By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 11:09 AM2019-12-09T11:09:40+5:302019-12-09T11:18:06+5:30Join usJoin usNext सध्याच्या या ताण-तणावाच्या आयुष्यात जगत असताना प्रत्येकालाच लहान सहान गोष्टींचा राग येत असतो. जर तुम्हालाही दैनंदिन आयुष्य जगत आसताना राग येत असेल तर बॉलिवूड स्टार सलमान खानने दिलेला सल्ला तुम्हाला नक्की उपयोगी ठरेल. बिगबॉस १३ मध्ये समावेश असलेल्या सिध्दार्थ शुक्ला याला सलमान खानने रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी एक मजेशील सल्ला दिला आहे. चला तर मग जाणून घेऊया रागावर ताबा कसा मिळवायचा. सलमान खानने सिध्दार्थ शुक्ला याला जेव्हा जेव्हा राग येईल. तेव्हा खाली झोपायचा सल्ला दिला आहे. सलमान खान स्वःत देखील या पध्दतीचा अवलंब करत असल्याचा उल्लेख केला आहे. सलमान खानच्या या सल्ल्याला ऑडीअंस तसच त्याच्या फॅन्सनीं विनोदात घेतलं पण खरचं तुम्हाला माहीत आहे का राग आल्यानंतर खाली काही वेळ पडणं. हा उपाय आरोग्याच्या दृष्टीकोनातून कितपत योग्य आहे. टेक्सास येथील एका युनिव्हरसीटीच्या अभ्यासानुसार याबाबतीत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. रागात असताना व्यक्ती जर खाली आडवी पडली तर रागावर नियंत्रण मिळवणे सोपे जाते. अप्रोच मोटीवेशन्सशी जोडल्या गेलेल्या या स्थीतीत एखादा व्यक्ती उभा असेल किंवा बसलेला असेल तर जास्त सक्रीय असतो. त्यांमुळे झोपल्यानंतर रागावर नियंत्रण मिळवता येते.टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यHealth TipsHealth