Know how many roti or chapatis should one eat for weight loss
वजन कमी करायचंय?; मग दिवसभरात खा एवढ्या चपात्या By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 11:59 AM2019-08-31T11:59:09+5:302019-08-31T12:11:05+5:30Join usJoin usNext आपल्या रात्रीच्या जेवणामध्ये डाळ, भाजी, चपाती, भात यांसारख्या पदार्थांचा सर्रास समावेश करण्यात येतो. भारतीय जेवणं चपातीशिवाय अपूर्ण आहे. कदाचित यामुळेच भाजी कोणतीही असली तरिही त्यामध्ये चपातीचा समावेश नसेल तर जेवण अपूर्ण वाटतं. आपम आपल्या भूकेनुसार एक किंवा दोन चपात्या खातो. पण जर तुम्ही वजन कमी करत असाल तर तुम्ही किती चपात्या खाणं फायदेशीर ठरतं? एका चपातीमधून मिळतात ही पोषक तत्व... गव्हाच्या पिठापासून तयार करण्यात आलेल्या एका चपातीमध्ये मॅक्रो-न्यूट्रिएन्ट्स मुबलक प्रमाणात असतात. यामध्ये प्रोटीन आणि फायबरही असतं. जर एक व्यक्ती साधारणतः 6 इंचाची चपाती खात असेल तर त्या व्यक्तीला 15 ग्रॅम कार्ब्स, 3 ग्रॅम प्रोटीन आणि 0.4 फायबर मिळतं. किती चपात्या खाणं ठरतं फायदेशीर? एखाद्या व्यक्तीने किती चपात्या खाव्या हे त्या व्यक्तीच्या शरीराला किती कार्ब्सची गरज आहे यावर अवलंबून असतं. दूध, सोडा, साखर, तेल यांसारख्या पदार्थांमधून कार्ब्स शरीरामध्ये जातात. अशातच जर तुमच्या डाएटमध्ये यांसारख्या पदार्थांचा समावेश असेल तर तुमच्या आहारामध्ये चपातीचा समावेश कमी करा. जर वजन कमी करत असाल तर... जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर त्यासाठी किती चपात्या खाणं गरजेचं असतं? नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, चपाती खाण्याचं प्रमाण हे पुरूष आणि महिलांसाठी वेगवेगळं असतं. अशा महिला ज्यांना डाएट प्लाननुसार, एका दिवसात 1400 कॅलरीज घेणं आवश्यक आहे, त्यांनी दुपारच्या जेवणामध्ये दोन आणि रात्रीच्या जेवणामध्ये दोन चपात्या खाणं गरजेचं आहे. तसेच पुरूषांच्या डाएट प्लॅननुसार, जर 1700 कॅलरीज घेणं आवश्यक असेल तर दुपारच्या जेवणामध्ये आणि रात्रीच्या जेवणामध्ये तीन चपात्यांचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. चपाती कधी खाणं ठरतं उत्तम? तसं पाहायला गेलं तर चपाती तुम्ही लंच किंवा डिनरमध्ये खाऊ शकता. परंतु, एक्सपर्टनुसार, दिवसा चपाती खाणं उत्तम ठरतं. खरं तर चपातीमध्ये असणारं फायबर पचनक्रिया स्लो करतं. रात्री चपाती खाल्याने झोपल्यानंतरही पचनक्रिया सुरूच राहते. जे शरीरासाठी ठिक नसतं. तेच जर दिवसभरात चपाती खाल्ली तर दिवसभरातील अॅक्टिव्हिटीमुळे ती अगदी सहज पचण्यास मदत होते.भातापेक्षा उत्तम ठरते चपाती चपातीमध्ये व्हिटॅमिन ए, बी1, बी2, बी3, कॅल्शिअम आणि आयर्न असतं. एवढचं नाही तर एका चपातीमध्ये एक कप भातापेक्षा जास्त फायबर असतं. जे पाचनक्रिया सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतं. त्यामुळे भातापेक्षा चपाती खाणं फायदेशीर ठरतं. भात आणि चपातीमध्ये राखावा समतोल तज्ज्ञांच्या मते, तसं पाहायला गेलं तर आहारात चपातीचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. परंतु आहारात दोन्ही पदार्थांचा समतोल राखणंही आरोग्यासाठी उपयुक्त ठरतं. पण प्लेन राइसचा जेवणात समावेश करणं शक्यतो टाळा. भात डाळीसोबत किंवा भाज्यांसोबत खाणं फायदेशीर ठरतो. टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोमताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता ही वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सपौष्टिक आहारWeight Loss TipsHealth TipsHealthy Diet Plan