Know the milk allergy causes and symptoms
मुलांना दूध देण्याआधी जाणून घ्या या गोष्टी; अन्यथा... By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 04:58 PM2019-05-24T16:58:03+5:302019-05-24T17:13:28+5:30Join usJoin usNext साधारणतः सर्वच आई-वडील मुलांवर दूध पिण्यासाठी जबरदस्ती करताना दिसतात. खरं तर दूधामध्ये असलेली पोषक तत्व आरोग्यासाठी उत्तम असतात म्हणून ते दूध पिण्यासाठी मुलांना सतत आग्रह करत असतात. परंतु बऱ्याचदा मुलं दूध प्यायल्यानंतर उलटी करतात. एवढचं नाही तर अनेकदा दूध प्यायल्यानंतर घशामध्ये जळजळ होत असल्याचेही सांगतात. पालकांना वाटतं की, मुलं दूध न पिण्यासाठी बहाणे करत आहेत. पण ही सर्व लक्षणं मिल्क अॅलर्जीकडे तुमचं लक्ष वेधत असतात. (Image Credit : Drink-Milk.com)लॅक्टोज इन्टॉलरेंस आणि मिल्क अॅलर्जीमध्ये असलेला फरक मिल्क अॅलर्जीला नेहमी लॅक्टोज इन्टॉलरेंसशी जोडून पाहिलं जातं. दरम्यान, लॅक्टोज इन्टॉलरंसच्या समस्येच्या या स्थितीमध्ये होत असते, जेव्हा शरीरामध्ये लॅक्टोज नावाच्या एंजाइमची कमतरता असते. ज्यामुळे शरीरामध्ये लॅक्टोज आल्यानंतर एन्जाइम्स तोडू शकत नाहीत. (Image Credit : Kxrb.com)काय आहे मिल्क अॅलर्जी? लॅक्टोज दूधामध्येही अस्तित्वात असतं. परंतु मिल्क अॅलर्जीचं मुख्य कारण दूधामध्ये असलेलं प्रोटीन असंत. याच्या सेवनाने शरीरामध्ये रोगांशी लढण्याच्या तंत्राशी प्रतिक्रिया देतात. ज्यामुळे व्यक्तीला त्रास होऊ लागतो. (Image Credit : FarmVille Direct - Cow Milk)मिल्क अॅलर्जीची लक्षणं दूधापासून होणाऱ्या अॅलर्जीची लक्षणं पुढिल प्रकारची असतात...उलटी होणं, पचवक्रियेच्या समस्या, पित्त होणं, ओठ किंवा चेहऱ्याच्या आजूबाजूला खाज येणं, त्वचा लाल होणं, चेहऱ्यावर सूज येणं, श्वास घेण्यास त्रास होणं. (Image Credit : Children's Health)इतर लक्षणं डोळ्यांमध्ये पाणी येणं, नाक वाहणं, डोकेदुखी होणं, गिळताना त्रास होणं, पोटाच्या समस्यांचा सामना करणंकाय करावं? जर तुमचं मुलंही दूध प्यायल्यानंतर या लक्षणांबाबत सांगत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. त्यांच्या सल्ल्यानुसारच उपचार फॉलो करा आणि मुलांना दूध देऊ नका. उपचार मिल्क अॅलर्जीवरील उपचार दीर्घकाळ चालतात. अनेक प्रकरणांमध्ये पीडित व्यक्तीची आयुष्यभर या अॅलर्जीपासून सुटका होत नाही. (Image Credit : babycenter.in)यापासून बचाव करा... अॅलर्जी झाली असेल तर मुलांना गाय, बकरी किंवा म्हैस कोणत्याही प्रकारचं दूध पिण्यासाठी देऊ नका. सोया दूधही त्यांच्यासाठी ठिक नाही. त्याचबरोबर दूधापासून तयार करण्यात आलेले इतर प्रोडक्ट्स अवॉइड करणं उत्तम ठरतं. टिप : वरील गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणत्याही प्रकारचा दाव करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं. टॅग्स :पौष्टिक आहारहेल्थ टिप्सपालकत्वदूधHealthy Diet PlanHealth TipsParenting Tipsmilk