Know right method to prepared and to drink Green Tea ....
जाणून घ्या ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ आणि पध्दत... By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 01:26 PM2019-12-04T13:26:00+5:302019-12-04T13:42:45+5:30Join usJoin usNext ग्रीन टी साधारणपणे वजन कमी करण्याच्या उद्देशाने प्यायली जाते. पण अनेकदा सतत ग्रीनटी चं सेवन केल्यानंतरही अनेकजणांच्या आरोग्यासंबंधी समस्या दूर होत नाहीत, कारण ग्रीन टी चं सेवन करताना ते कधी करावे आणि कसे हे माहित असणे गरजेचे आहे. ग्रीन टी रोज पिण्यामुळे आपले वजनपण कमी होते. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत मिळते. आपले शरीर तंदुरुस्त राहते. ग्रीन टी मुळे त्वचेच्या संबंधी विविध समस्यांवर फायदेशीर ठरते. ग्रीन टी च्या सेवनाने त्वचा निरोगी व ताजी तवानी बनते. तसेच उन्हाळ्यात त्वचेच्या सूर्यकिरणामुळे होणारा त्रास कमी होतो. ग्रीन टी च्या नियमित वापरामुळे काही प्रकारच्या कॅन्सरचा प्रतिबंध करता येतो असंही जगभरात निदर्शनास आलं आहे. यामध्ये ग्रीन टीमधील अँन्टिऑक्सिडेन्टचा मोठा वाटा आहे. ते उत्तम प्रमाणात मिळावेत यासाठी ग्रीन टी दूध न टाकता घेतला पाहिजे . उतारवयामध्ये मेंदूच्या पेशींची होणारी झीज किंवा डीजनरेशन यापासून ग्रीन टी मेंदूचं रक्षण करतो. अल्झायर्मस किंवा पार्किन्सन्स अशा मेंदूच्या घातक आजारांपासून काही प्रमाणात बचाव करता येतो ग्रीन टी च्या सेवनाने कोलेस्टेरोल कमी होत असल्याने ह्याचे सेवन हृदयाच्या आरोग्याकरीता देखील चांगले आहे. ग्री टी मध्ये असलेल्या गुणकारी तत्वांमुळे हृदयाला होणारा रक्तप्रवाह सुरळीत राहतो. त्यामुळे उच्चरक्तदाबासारखे विकार टाळण्यास मदत होते. ग्रीन टी चं सेवन करत असताना कोणत्यावेळी करायला हवं हे देखील तितकेच महत्त्वाचं आहे. काही खाल्यानंतर अर्ध्या तासानंतर ग्रीनटी घ्यावी , तसेच जेवणाच्या २ तास आधी किंवा २ तास नंतर ग्रीन टी घेणं लाभदायक ठरतं ग्रीन टीच्या वापरामुळे शरीरातील रोग उत्पन्न करणारे जीवाणू मरतात. त्यामुळे विविध प्रकारच्या जंतुसंसर्गाला आळा बसतो. ग्रीन टी सर्वप्रथम पाणी उकळावं. गॅस बंद करून त्यात ग्रीन टी पावडर किंवा ग्रीन टी डीप सॅशे टाकून झाकण ठेवावं. आणि दोन मिनिटं ते मुरू द्यावं. चवीला किंचित लिंबू, आलं नाहीतर पुदिना किंवा गवती चहा घातला तरी चालेल पण साखर किंवा दूध घालू नका.टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यHealth TipsHealth