Know the side effects of tea and what is best time to drink tea myb
सावधान! 'या' पद्धतीने चहाचं सेवन कराल, तर स्वतःहून आजारांना बळी पडाल By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 11:39 AM2020-03-19T11:39:36+5:302020-03-19T11:54:53+5:30Join usJoin usNext भारतात खूप कमी लोक असे आहेत जे चहाला नाही म्हणतात. दिवसाची सुरूवात चहाने केल्यानंतर अनेकजणांना दिवसभरातील काम करत असताना सतत काहीवेळानंतर चहा पिण्याची सवय असते. तुम्हाला माहित असेल अनेक आजरांचं सगळ्यात मोठं कारण चहाचं अतिसेवन हे आहे. चहाचे जसे फायदे आहेत. त्याचप्रमाणे शरीरासाठी नुकसानकारक सुद्धा असतं. आज आम्ही तुम्हाला चहाचे सेवन कशा पध्दतीने करू नये याबाबत सांगणार आहोत सकाळी चहाचं सेवन करण्याची सवय सगळ्यांनाच असते. पण सकाळी रिकाम्यापोटी चहा प्यायल्याने एसिडीटीची समस्या उद्भवू शकते. भूक मरते, मेटाबोलिझ्मही मंदावतं. म्हणून उठल्यानंतर आधी गरम पाण्याचं सेवन करा. म्हणजे तुमची पचनक्रिया चांगली राहते. त्यानंतर नाष्त्याला काही पौष्टीक पदार्थ खाल्यानंतर चहाचं सेवन करा. रात्रभर शरीराला पाणी मिळत नाही, त्यामुळे शरीर डिहायड्रेट झालेलं असतं. अशावेळी तुम्ही चहा प्याल तर डिहायड्रेशनची समस्या वाढू शकते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी रिकाम्या पोटी 2 ग्लास पाणी प्या. एक किंवा दोनपेक्षा जास्त वेळा चहा पित असाल, तर तुमची भूक मरते, कारण यामध्ये कॅफिने भरपूर प्रमाणात असतं. शिवाय तुमची ऊर्जाही कमी होते आणि झोपेवर परिणाम होऊ शकतो. चहा जास्त उकळून प्यायल्यानेही चहातील निकोटिनामाइडचं प्रमाण वाढतं, जे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. चहा सतत प्यायल्याने लठ्ठपणाची समस्या सुद्धा उद्भवते. कारण दुधातील फॅट्स आणि साखर या पदार्थांचा आहारात जास्त समावेश असल्यामुळे वजन वाढू शकतं. भरपूर वेळ आधी बनवलेला चहा तुम्ही पुन्हा गरम करून पित असाल, तर असा चहा विषापेक्षा कमी नाही. त्यामुळे ताजा चहा प्या. सतत चहा प्यायल्यामुळे दात खराब होतात. त्यामुळे तुमचं इंप्रेशन खराब होऊ शकतं. म्हणून दिवसातून जास्त चहा पिणं टाळा. टॅग्स :हेल्थ टिप्सअन्नHealth Tipsfood