Know the side effects of toxins in the body, may affects to kidney myb
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर न पडल्याने उद्भवू शकतात 'या' गंभीर समस्या, जाणून घ्या लक्षणं By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 12:30 PM2020-05-12T12:30:18+5:302020-05-12T13:01:12+5:30Join usJoin usNext शरीर निरोगी राहण्यासाठी नको असलेले टॉक्सिन्स म्हणजेच विषारी पदार्थ बाहेर पडणं महत्वाचं असतं. शरीरातील विषारी घटक मुत्राशद्वारे किडनीच्या मदतीने शरीराबाहेर काढले जातात. पण किडन्या सुरळीत काम करत नसतात तेव्हा अनावश्यक आणि अपायकारक घटक शरीरात जसेच्या तसे राहतात. रक्तातील त्यांचे प्रमाण वाढते, त्यामुळे रक्त दुषित होत जाते. याचा सरळ परिणाम झोपेवर होत असतो. त्यामुळे गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता असते. सध्या लॉकडाऊनमुळे शरीराची फारशी हालचाल होत नाही त्यामुळे अनेकांना पोट साफ न होणं, गॅस असे पोटाचे विकार उद्भवत आहेत. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर न पडल्यामुळे किडनीच्या विकारांचा सामना करावा लागू शकतो. किडनी डी व्हिटामीनचं रुपांतर EPO या हार्मोनमध्ये करते. EPO हार्मोन शरीरातील लाल रक्तपेशीच्या वाढीवर नियंत्रण ठेवत असतो. जर किडनी व्यवस्थित काम करत नसतील तर शरीरातील लाल रक्तपेशीच्या तयार होण्यावर त्याचा सरळ परिणाम होत असतो. किडनी शरीरातल्या अनावश्यक घटकांना बाहेर फेकू शकत नाही तेव्हा शरीरात पाण्याची कमरता भासते. त्यामुळे शरीर कोरडे पडत जाते. शरीरातील पाणी कमी झाल्याने हाडांचे आजार उद्भवतात. किडनी जर व्यवस्थित काम करत नसेल तर अनावश्यक टाकाऊ पदार्थ शरीरात राहतात. त्यामुळे जिभेच्या चवीवर परिणाम होतो. तोंडाचा वास येतो. वजन प्रचंड कमी होत जातं. श्वास घ्यायला त्रास होणं. हे देखील किडनी विकाराचं एक दृश्य लक्षण आहे. शरीरात असलेलं एक्सेस फ्लुइड त्याला कारणीभूत असतं. किडनीच्या विकारामुळे रक्ताचा कर्करोग होण्याचा धोका देखील निर्माण होत असतो. त्यामुळे चेहऱ्यावर पांढरे चट्टे येणे आणि झोपताना थकवा येणे अशी लक्षणं दिसायला सुरूवात होते. लघवीचा त्रास होणे, ताप येणे, अंगदुखी हे किडनी निकामी होण्याचे लक्षण आहे. जास्त प्रमाणात गोळ्या घेतल्यामुळे सुद्धा किडनीचे कार्य बिघडण्याची शक्यता असते. लघवीचा त्रास होणे, ताप येणे, अंगदुखी हे किडनी निकामी होण्याचे लक्षण आहे. जास्त प्रमाणात गोळ्या घेतल्यामुळे सुद्धा किडनीचे कार्य बिघडण्याची शक्यता असते. टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यHealth TipsHealth