शरीरात पाण्याची कमतरता असेल तर होतात या गंभीर समस्या, अजिबात करू नका दुर्लक्ष By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 04:40 PM 2022-07-13T16:40:10+5:30 2022-07-13T16:47:07+5:30
lack of water diseases: जेव्हा तुम्ही दिवसभरात भरपूर पाणी पिता तेव्हा याने फ्री रॅडिक्लससोबत लढण्यास मदत मिळते. ज्याने त्वचा आणि अवयव चांगले राहतात. पण जेव्हा शरीरातील पाणी कमी होतं तेव्हा काही आजार वाढतात. आपल्या शरीरात 70 टक्क्यांपेक्षा जास्त पाणी असतं आणि शरीराच्या अवयवांना योग्यप्रकारे काम करण्यासाठी याची गरज असते. पाण्याच्या कमतरतेमुळे ब्रेन, टिश्यूज आणि मांसपेशींचं आरोग्य प्रभावित होतं. त्याशिवाय पाणी शरीराला डिटॉक्स करण्यासाठीही गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही दिवसभरात भरपूर पाणी पिता तेव्हा याने फ्री रॅडिक्लससोबत लढण्यास मदत मिळते. ज्याने त्वचा आणि अवयव चांगले राहतात. पण जेव्हा शरीरातील पाणी कमी होतं तेव्हा काही आजार वाढतात.
लठ्ठपणा वाढतो - पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी आणि अपशिष्ट पदार्थ बाहेर काढण्यास मदत मिळते. पाण्याने पोटही भरलेलं राहतं आणि पचनक्रियाही व्यवस्थित होण्यास मदत मिळते. तेच पाणी जेव्हा कमी होतं, तेव्हा मेटाबॉलिज्म स्लो होतं. फॅट आणि टॉक्सिन्स शरीरात जमा होऊ लागतात. यानेच लठ्ठपणा वाढतो. त्याशिवाय पाण्याची कमतरता झाली तर क्रेविंगही वाढतं. ज्यामुळे विनाकारण भूक लागते आणि याने लठ्ठपणा वाढतो.
हात-पायात जळजळ होण्याची समस्या - पाणी शरीरात वाढलेल्या पीएच आणि अॅसिडला न्यूट्रीलाइज करण्यास मदत मिळते. सोबतच पित्त वाढल्याने हात-पायात जळजळ वाढते. अशात पाण्याचं सेवन योग्य प्रमाणात करत राहिल्याने ही समस्या दूर होऊ शकते. त्यासोबतच पाणी पित राहिल्याने पोट थंड राहतं, तसेच हात-पायातील जळजळीची समस्या कमी होऊ लागते.
हाय ब्लड प्रेशर वाढतं - शरीरातील सर्व क्रिया व्यवस्थित होण्यासाठी पाण्याची गरज असते. शरीरात केवळ रक्त धमण्या, नसा आणि कोशिका भरण्यासाठी पुरेसं नसतं. भरपूर पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात आणि ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. सोबतच रक्तात तरल पदार्थ कायम राहतं. ज्याने रक्ताचं प्रमाणही योग्य राहतं. याने धमण्या मोकळ्या राहतात आणि ब्लड प्रेशर वाढत नाही.
बद्धकोष्टतेची समस्या - बद्धकोष्टतेची समस्या अशा लोकांमध्ये जास्त असते जे भरपूर प्रमाणात पाणी पित नाही. पाण्याच्या कमतरतेमुळे मेटाबॉलिज्म स्लो होतं आणि बॉवेल मुव्हमेंटही प्रभावित होते. याने बद्धकोष्टतेची समस्या वाढते आणि मल पास करण्यास समस्या होते. अशा लोकांनी नियमितपणे भरपूर पाणी प्यावं.
खराब ब्लड सर्कुलेशन - पाण्याची कमतरता असेल तर आपल्या ब्लड वेसेल्सचं नुकसान होतं. याने आपलं ब्लड सर्कुलेशन प्रभावित होतं आणि याने शरीरात सूज वाढते. टॉक्सिन वाढतात. बीपी सुद्धा वाढतो आणि त्वचेच्या अनेक समस्या होतात. अशात पाणी भरपूर प्यायला हवं.