leak proof bamboo bottles rapidly getting popularity
पर्यावरणस्नेही बांबूच्या बाटल्या पाहिल्यात का? By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 02:11 PM2020-01-08T14:11:48+5:302020-01-08T14:16:33+5:30Join usJoin usNext तांब्याच्या, मातीच्या बाटल्यांनंतर आता बांबूच्या बाटल्या बाजारात येऊ लागल्या आहेत. आसाममध्ये राहणाऱ्या धिर्तीमान बोरा नावाच्या व्यक्तीनं बांबूच्या बाटल्यांची निर्मिती केली आहे. बोरा यांनी तयार केलेल्या बांबूच्या बाटल्या १०० टक्के लिक-प्रूफ आहेत. दैनंदिन जीवनातील प्लास्टिकचा वापर कमी व्हावा यासाठी बोरांनी बांबूच्या बाटल्या तयार करण्यावर भर दिला. बांबूच्या बाटलीतून पाण्याची गळती होऊ यासाठी बोरा यांनी जवळपास १७ वर्षे त्यावर काम केलं. बांबूच्या बाटल्यांना वॉटरप्रूफ पॉलिश देण्यात आलं आहे. या बाटलीचं झाकणदेखील बांबूपासूनच तयार करण्यात आलं आहे. बांबूच्या बाटल्यांमध्ये पाणी अतिशय थंड राहतं. अगदी कडाक्याच्या उन्हातही या बाटलीतलं पाणी गार राहतं. बांबूची एक बाटली तयार करण्यासाठी ४ ते ५ तासांचा कालावधी लागतो. बांबूच्या बाटलीची किंमत ४०० ते ६०० रुपयांना मिळते.