जाणून घ्या, आवळ्याचे आरोग्यदायी फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 15:42 IST2019-04-04T15:33:56+5:302019-04-04T15:42:34+5:30

आवळ्यामध्ये असणारी औषधी गुणधर्म बीटा ब्लॉकरच्या प्रभावाला कमी करतात. यामुळे तुमचे हृदय तंदुरुस्त राहते. तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे कामही आवळा करतो.

आयुर्वेदात आवळ्याचे अनेक उपयोग सांगितले आहेत. पित्तशामक, केशवर्धक, शक्तीवर्धक, निरोगी त्वचेसाठी आणि आता डायबेटिस, कॅन्सरसाठीही आवळ्याचे सेवन केले जाते.

आवळा सेवन केल्याने तुमची हाडे मजबूत होतात. आवळ्यात मोठ्या प्रमाणावर कॅल्शिअम असते. यामुळे ऑस्ट्रोपोरोसिस, अर्थराईटीस आणि हाडांचे प्रॉब्लेम यामध्ये अराम मिळतो.

आवळ्याच्या रस नियमितपणे सेवन केल्याने याचा फायदा तुमच्या डोळ्यांना नक्कीच होऊ शकतो. मोतीबिंदू, दृष्टी कमी होणे, ब्लाईंडनेस यासारखे आजार दूर होतात.

मधुमेहाच्या समस्येवर आवळा गुणकारी आहे. आवळ्यामध्ये क्रोमियम तत्व मोठया प्रमाणावर असतात. यामुळे तुमच्या शरीरातील इन्सुलिन पेशी मजबूत होऊन शरीरातील साखरेचे प्रमाणावर नियंत्रण ठेवता येते.

आवळ्यामध्ये असणारी औषधी गुणधर्म बीटा ब्लॉकरच्या प्रभावाला कमी करतात. यामुळे तुमचे हृदय तंदुरुस्त राहते. तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे कामही आवळा करतो.

आवळ्याचे शास्त्रीय नाव फायललँथस एम्ब्लिका असून फायलँथॅसी हे त्याचे कूळ आहे. फायलँथस हे नाव एका ग्रीक शब्दावरून पडले असून त्याचा अर्थ पानावर असलेली फुले, असा होतो.