lifestyle superfoods in diet to keep heart healthy
हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचा समावेश नक्की करा By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 01:36 PM2020-01-19T13:36:24+5:302020-01-19T13:51:46+5:30Join usJoin usNext बदलत्या जीवनशैलीमुळे वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. हृदयरोगाचा धोका वाढत आहे. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, दुर्लक्ष करणे यामुळे अनेकदा आरोग्य बिघडते. हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करायचा हे जाणून घेऊया. ब्रोकली ब्रोकली ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. शरीरातील नुकसानकारक विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. व्हिटॅमिन सी, कॅल्शिअम, व्हिटॅमिन के, ओमेगा 3 फॅटी अॅसिड, पोटॅशिअम, मॅगनीज, फॉस्फोरससारखे तत्व असतात. त्यामुळे याचा नियमित आहारात समावेश केल्याने रक्त शुद्ध राहण्यासोबतच वेगवेगळ्या दृष्टीने फायदा होतो. बेरीज बेरीजमध्ये अनेक पोषक घटक असतात. अँटीऑक्सिडेंट्सचे प्रमाणही अधिक असते. तसेच कॅलरीचे प्रमाण कमी असून फायबरचे प्रमाण अधिक असते. ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी मदत करतात. स्टॉबेरी, ब्लूबेरी, रासबेरी यासारख्या सर्व प्रकारच्या बेरीज हृदयासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे आहारात बेरीजचा समावेश असावा. फ्लॅक्ससीड्स फ्लॅक्ससीड्समध्ये फायबर, पोटॅशियम, ओमेगा 3 चे प्रमाण हे अधिक असते दे हृदयासाठी उपयुक्त ठरते. डायबेटीस आणि हायपरटेंशनचा धोकाही यामुळे कमी होतो. अक्रोड ड्रायफ्रुट्समध्ये प्रामुख्याने सामविष्ट करण्यात येणारं अक्रोड शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. अक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळत असून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही हे अत्यंत फायदेशीर ठरतं. हृदयासंबंधित आजारांसाठीही अक्रोड परिणामकारक ठरतं. स्मरणशक्तीसाठीही अक्रोड खाणं गुणकारी असतं. दही दह्यामध्ये कॅल्शिअम, प्रोटीन, व्हिटॅमिन आढळून येतं. दूधाच्या तुलनेत दही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. दही हृदयासंबंधित आजारांसाठी आणि पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं. दह्याचे सेवन दररोज केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मदत होते. आहारात ताज्या भाज्या आणि फळांचा समावेश करा. टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. टॅग्स :हृदयरोगहेल्थ टिप्सअन्नHeart DiseaseHealth Tipsfood