Liver Detox : 'या' आयुर्वेदिक गोष्टींचा आहारात करा समावेश; लिव्हर राहील निरोगी, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 02:24 PM2024-08-02T14:24:46+5:302024-08-02T20:35:53+5:30

Liver Detox : लिव्हर निरोगी ठेवायचं असेल तर आयुर्वेदही खूप फायदेशीर आहे.

सध्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोकांना अनेक प्रकारचे आजार होत आहेत. अशातच लोकांना यकृताशी (लिव्हर) संबंधित समस्यांचाही सामना करावा लागत आहे. तज्ज्ञांच्या मते, दारू, जंक फूड आणि प्रदूषणामुळे लोकांच्या लिव्हरवरही विपरीत परिणाम होत असतात.

लिव्हर आपल्या शरीराला डिटॉक्स करण्याचं काम करतं. जर तुमचं लिव्हर हेल्दी नसेल तर तुम्हाला अनेक आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागेल. यासाठी लिव्हर निरोगी ठेवायचं असेल तर आयुर्वेदही खूप फायदेशीर आहे. त्यामुळं कोणत्या आयुर्वेदिक गोष्टींचा वापर करावा, हे जाणून घ्या...

त्रिफळामध्ये मैरोबलन, बहेडा आणि आवळा यासारख्या गोष्टींचा समावेश असतो. लिव्हर स्वच्छ करण्यासाठी देखील हे खूप फायदेशीर मानलं जातं. त्रिफळा चूर्ण सेवन केल्याने बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. रात्री कोमट पाण्यासोबत खाऊ शकता.

तुळशीमध्ये अँटीबैक्टीरियल, अँटीव्हायरल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. हे लिव्हरला डिटॉक्स करण्यास मदत करते. तुळशीची ताजी पानं चघळता येतात किंवा त्याचा रस काढून प्यायला जातो. याशिवाय तुळशीचा चहाही पिऊ शकता.

हळद यकृत डिटॉक्स करण्यास देखील मदत करते. यामध्ये कर्क्यूमिन नावाचे संयुग असते, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. अँटीफंगल गुणधर्माने समृद्ध असलेली हळद लिव्हरचे डिटॉक्सिफाय करण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. तुम्ही हळदीचे पाणी किंवा दूध पिऊ शकता. हळदीतील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

गिलॉय हे आयुर्वेदात महत्त्वाचे मानलं जातं. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर आहे. या औषधी वनस्पतीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म देखील असतात. लिव्हर स्वच्छ करण्यासोबतच ते विषारी पदार्थ म्हणजेच टॉक्सिंस काढून टाकण्यास मदत करते. गिलॉय ज्यूस प्यायल्याने लिव्हर निरोगी राहते.