डाएट, एक्सरसाईजचा कंटाळा येतो? टेन्शन नॉट! आता झोपुन करा वजन कमी, 'या' आहेत टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 07:56 PM2022-08-16T19:56:19+5:302022-08-16T20:09:33+5:30

जास्तीचे वजन कमी करण्यासाठी आपली धडपड चाललेली असते. व्यायाम करणे आणि आहाराचे पालन करणे हे तुमची फिटनेस उद्दिष्टे साध्य करण्याचे सामान्य मार्ग आहेत. मात्र आता तुम्ही झोपेतदेखील वजन कमी करू शकता.

जर तुम्ही नियमित व्यायाम आणि आहार योजनेचे पालन करू शकत नसाल तर वजन कमी करण्यासाठी तुम्ही झोपण्याच्या तंत्रावर अवलंबून राहू शकता. चला तर मग जाणून घेऊया झोपेदरम्यान काय केल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते.

झोपण्यापूर्वी हे पदार्थ टाळा : रात्रीचे हलके जेवण करा. कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन करू नका. हलके अन्न खाल्ल्याने पचनक्रिया वाढते आणि झोपताना कॅलरीज बर्न होतात. झोपण्यापूर्वी चहा-कॉफी पिऊ नका.

झोपेसाठी योग्य वातावरण : झोपताना खोलीत कमीत कमी प्रकाश असावा. कारण तेजस्वी प्रकाश झोपेत अडथळा आणू शकतो. आरामदायी मॅट्रेस निवडा आणि झोपण्यासाठी स्वच्छ चादर वापरा.

जेवणानंतर काही वेळाने झोप : रात्रीचे जेवण करून लगेच झोपायला गेल्यास तुमची पचनक्रिया व्यवस्थित होत नाही. तज्ज्ञांनी नेहमी झोपायच्या किमान 2 ते 3 तास आधी जेवण्याचा सल्ला दिला आहे.

ब्लँकेटशिवाय झोपा : थंड तापमानात झोपल्याने पचनक्रिया वाढण्याची शक्यता असते. ज्यामुळे अधिक कॅलरी जाळण्यास मदत होते. संशोधनानुसार, खोलीचे तापमान कमी केल्याने चांगले ब्राऊन फॅट वाढते. ज्यामुळे रक्तातील साखरेपासून मुक्ती मिळते आणि कॅलरीज बर्न होतात.

झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा अन्य गॅझेट्सचा वापर करणं हानिकारक असल्याचं अनेक शोधातून दिसून आलं आहे. त्यातून निघणाऱ्या ब्लू लाईटमुळे तुमच्या स्लीप हार्मोन मेलाटोनिनचा स्तर कमी करतात. मेलाटोनिन कमी होताच तुमची भूक वाढते आणि एक्स्ट्रा कॅलरीजमुळे वजन वेगाने वाढते. त्यामुळे झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर करू नका.

स्लीप हार्मोन मेलाटोनिन शरीरात ब्राऊन फॅट उत्पन्न करते. त्यामुळे एक्स्ट्रा कॅलरी बर्न होतात. जर तुम्ही अंधारात झोपाल तर शरीर अधिक मेलाटोनिनचा संचार करेल. त्यामुळे वजन कमी होण्यास मदतच होईल. त्यामुळे नाईट बल्ब किंवा लॅम्प लावून झोपण्याऐवजी अंधार करून झोपा.

झोपता झोपता वजन कमी करायचं असेल तर रुम थंड ठेवा. डायबेटिक जर्नलनुसार, जर तुमची खोली थंड राहिली तर तुमचं शरीर स्वत:ला उष्ण ठेवण्यासाठी फॅटचा वापर करतं. त्यामुळे झोपताना तुमचं एक्स्ट्रा फॅट बर्न होतं. त्यामुळे वेगाने वजन घटतं.

झोपण्यापूर्वी एक कपभर गरम कॅमोमाईल टी प्या. त्यामुळे चांगली झोप लागते. कॅमोमाईल टीमुळे शरीरातील ग्लाइसिनचा स्तर वाढतो. त्यामुळे झोप येते. त्यामुळे ही टी प्याच. मग बघा झोपता झोपता तुमचं वजन कसं कमी होतं.