losing the health of women stay on for a long time stay alert
एकाच जागेवर खूप वेळ बसून राहणे महिलांसाठी हानिकारक By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 07:28 PM2019-02-13T19:28:59+5:302019-02-13T19:33:44+5:30Join usJoin usNext रोगप्रतिकारकशक्तीवर परिणाम नियमित 10 तास बसून काम केल्यास रोगकारकशक्तीवर विपरित परिणाम होतो. कारण, तुम्ही खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष करता, याचा थेट दुष्परिणाम रोगप्रतिकारकशक्तीवर होतो.बॉडी पॉश्चर बिघडते एकाच ठिकाणी दीर्घ काळ बसल्यास कंबर आणि मानेवर सर्वाधिक ताण येतो. यामुळे तुमच्या शरीराचे पॉश्चर बिघडण्याची शक्यता आहे. मान आणि पायांचे दुखणे बहुतांश महिलांची मान आणि पायांच्या दुखण्याची तक्रार असते. एकाच ठिकाणी बसून राहिल्यानं हा त्रास होऊ शकतो. भविष्यात हा धोका होऊ नये, यासाठी कामाच्या अधे-मधे स्वतःसाठी वेळ काढून पाय मोकळे करावेत. लठ्ठपणा आणि कॅन्सरचा धोका महिलांमध्ये वाढणारा लठ्ठपणा आणि कॅन्सर रोगाचे प्रमुख कारणांपैकी एक कारण म्हणजे एकाच जागी बसून राहणे. अधिक वेळापर्यंत बसून राहिल्याने स्नायू आणि रक्तवाहिन्यांमधील एन्जाइम अतिरिक्त चरबी एका ठिकाणी रोखून ठेवते. ज्यामुळे लठ्ठपणा आणि कोलोन कॅन्सरचा धोका बळावू शकतो. थकवा येणे ज्या महिला प्रत्येक दिवशी सलग 10 तास बसून काम करतात. वाढत्या वयासोबत त्यांना यामुळे शारीरिक कमजोरींच्या समस्यांचा सामना करावा लागतो. हा त्रास होऊ नये, यासाठी एकाच ठिकाणी सलग काही तास बसून काम करणं टाळा.मेंदूच्या कार्यासाठी हानिकारक केवळ शरीरासाठीच नाही तर बराच वेळ एकाच जागी बसून काम केल्यास मेंदूवरही याचा वाईट परिणाम होतो. यामुळे तणाव, नैराश्य सारख्या समस्यांना निमंत्रण मिळते. टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सHealthHealth Tips