lung firbrosis is major medical condition in corona patients at science
चिंताजनक! भारतासह अमेरिका, ब्रिटेनमधील कोरोना रुग्णांना उद्भवते फुफ्फुसांची गंभीर समस्या By ravalnath.patil | Published: November 27, 2020 09:05 PM2020-11-27T21:05:31+5:302020-11-27T22:50:37+5:30Join usJoin usNext कोरोना व्हायरसमुळे भारत, अमेरिका आणि युरोपमधील बर्याच रुग्णांमध्ये फुफ्फुसांची एक मोठी समस्या उद्भवल्याचे समोर येत आहे. जर ही समस्या गंभीर असेल तर रुग्णाचे जीव धोक्यात येऊ शकतात. या फुफ्फुसांच्या संसर्गामुळे कोरोना रूग्ण थकतात. श्वास घेण्यास खूप त्रास होते. भारत, अमेरिका आणि युरोपमधील बर्याच रुग्णांमध्ये ही समस्या असल्याचे समोर आले आहे. कोरोनामुळे होणाऱ्या या आजाराचे नाव लंग फायब्रोसिस आहे. त्याला पल्मोनरी फायब्रोसिस देखील म्हणतात. यासंबंधीचा एक लेख लंग इंडिया नावाच्या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. डॉ. जरीर एफ. उदवागिया, डॉ. परवेज ए. कौल आणि डॉ. लुका रिडेल्डी यांनी लिहिला आहे. या तिन्ही डॉक्टरांनी त्याला पोस्ट कोविड - १९ इंटरस्टिशियल लंग डिजीस (PC-ILD) म्हटले आहे. ‘द इंडियन एक्सप्रेस’ च्या वृत्तानुसार, जगभरातील ६० कोटीहूनही अधिक लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यापैकी बहुतेक लोक सौम्य किंवा मध्यम संक्रमणाने ग्रस्त आहेत. केवळ १० टक्के लोकांना गंभीर कोविड -१९ न्यूमोनिया आहे. केवळ ५ टक्के लोक असे आहेत ज्यांना तीव्र श्वसनाचा त्रास सिंड्रोम (ARDS) नावाचा आजार आहे. याचा अर्थ असा आहे की, केवळ ५ ते १० टक्के लोक लंग फायब्रोसिसची (Lung Fibrosis) तक्रार करीत आहेत. लंग फायब्रोसिस या रोगात फुफ्फुसातील ऊतक म्हणजेच टिश्यू (Tissue) सूजण्यास सुरुवात होते. यामुळे फुफ्फुसांच्या आतल्या हवेची जागा कमी होऊ लागते. याचा परिणाम म्हणजे श्वास घेण्यात अडचण होते. यामुळे एखाद्या व्यक्तीला थकवा जाणवतो. जर परिस्थिती अधिक गंभीर झाली तर रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो किंवा त्याला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. डॉ. उदवागिया म्हणाले की, आम्ही सतत लंग फायब्रोसिसची प्रकरणे पाहत आहोत. जुलै महिन्यात एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनीही देशातील डॉक्टरांना कोरोना रूग्ण बरे झाल्यानंतरही त्यांचे इतर अवयव तपासून पाहावेत आणि कोरोनामुळे त्या अवयवांमध्ये काही त्रास आहे की नाही ते पाहावे, असे म्हटले होते. याचबरोबर, डॉ. उदवागिया यांनी सांगितले की, काही रुग्णांना बरे झाल्यानंतरही त्यांच्या घरी ऑक्सिजनची आवश्यकता असते. जेव्हा रुग्ण बरे झाल्यानंतर तीन महिन्यांनंतर सीटी स्कॅन केला जातो, तेव्हा त्यांच्या फुफ्फुसांची अवस्था अत्यंत खराब असल्याचे निदर्शनास आले आहे. तीन दशकांपूर्वी लंग फायब्रोसिस रोग सहसा फारच कमी लोकांना होता. ज्यास्तकरून हा रोज वयस्कर लोकांना होता. फुफ्फुसांची ऊतक सूजलेली आहे. ऑक्सिजनची कमतरता आहे. अशा परिस्थितीत, शरीरात रक्ताचा प्रवाह कमी होऊ लागतो. हृदय योग्यरित्या कार्य करत नाही. याचा परिणाम बहु-अवयव निकामी होणे, हृदयविकाराचा झटका किंवा गंभीर स्थितीत मृत्यू देखील असू शकतो. डॉ. उदवागिया म्हणतात की, मला आशा आहे की बहुतेक लोक फुफ्फुसातील रोग पासून बरे होऊ शकतात. परंतु काही लोकांमध्ये हा आजार घर करून बसेल. जर लंग फायब्रोसिस दीर्घकाळापर्यंत एखाद्या रूग्णात राहिला तर त्याला श्वसनसंस्थेशी संबंधित दीर्घकाळ आजार असू शकतात किंवा तो कायमच फुफ्फुसांच्या आजाराने ग्रस्त असू शकतो. या रोगाचा सर्वात मोठा इलाज म्हणजे बचाव. टॅग्स :कोरोना वायरस बातम्याआरोग्यcorona virusHealth