Make homemade conditioner and give strength to your hair
घरच्या घरी कंडिशनर बनवा, केसांना नवं तेज - ताकद द्या! By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 04:20 PM2018-02-22T16:20:12+5:302018-02-22T16:32:24+5:30Join usJoin usNext केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी तुम्हाला केसाला तेल लावून व्यवस्थित मसाज करावा लागतो तसंच त्यावर महागडे कंडिशनर लावून त्यांची निगा घ्यावी लागते. पण बाजारातील महागड्या कंडिशनरमध्ये मोठ्या प्रमाणावर केमिकल्सचाही वापर केलेला असतो. त्यापेक्षा घरगुती कंडिशनर तुमच्या केसांना नवी बळकटी आणि तेज देऊ शकतं. १) केळ्याचा हेअर मास्क - केळ्याचा हेअर मास्क बनवण्यासाठी एक केळं, मध आणि खोबरेल तेल घ्यावं. या तिन्हीचं मिश्रण घेऊन त्याची पेस्ट तयार करा व ही पेस्ट केसांवर १५-२० मिनिटे लावून ठेवा. २० मिनिटांनंतर केस स्वच्छ पाण्याने धुवून टाका. २) खोबरेल तेलाचं कंडिशनर - खोबरेल तेलाचं कंडिशनर बनवण्यासाठी एक मोठा चमचा मध, खोबरेल तेल, लिंबाचा रस, दही व गुलाबपाणी घ्यावं. व्यवस्थितरित्या मिश्रण करून शॅम्पू केलेल्या केसांवर लावा. १० ते १५ मिनिटांनी धुवून टाका. खोबरेल तेलामुळे तुमचे केस घनदाट व चमकदार होतील तसंच त्यांची वाढही चांगली होईल. ३) दह्याचं कंडिशनर - दह्याचं कंडिशनर बनवण्यासाठी दही ढवळून त्यात थोडं गुलाब पाणी टाकून मिश्रण करून केसांवर मसाज करा. अर्धा तास ठेवून त्यानंतर साध्या पाण्याने केस धुवून टाका. दह्यामुळे आपल्या केसांच्या मुळांना पोषण मिळतं. त्यामुळे केसाच्या आतील त्वचा कोरडी पडत नाही. ४) कोरफडीचं कंडिशनर - कोरफडीचं कंडिशनर हे केसांच्या आरोग्यासाठी गरजेचं असतं. केस शॅम्पूने धुवून त्यानंतर त्यावर लिंबाचा रस व कोरफडीचा गर यांचं मिश्रण लावा. ५-१० मिनिटे ठेवून केस कोमट पाण्याने धुवा. त्यामुळे केस चमकदार दिसतील व कोंडाही कमी होईल.टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सHealthHealth Tips