mask alone cannot protect you from corona virus reveals study
CoronaVirus News: ...तर मास्कदेखील तुम्हाला कोरोनापासून वाचवू शकणार नाही; महत्त्वाची माहिती समोर By कुणाल गवाणकर | Published: December 24, 2020 02:30 PM2020-12-24T14:30:24+5:302020-12-24T14:33:09+5:30Join usJoin usNext कोरोनापासून बचाव करण्यासाठी वारंवार हात धुण्याचं, मास्क लावण्याचं, सुरक्षित अंतर राखण्याचं आवाहन केलं जात आहे. अनेक जण घराबाहेर पडताना मास्क वापरत नाहीत. कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्यानं मास्क घालण्यास टाळाटाळ करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. बरेच जण मास्क घालून गप्पा मारताना दिसतात. मास्क घातला असल्यानं आपल्याला कोरोना होणार नाही, असा विश्वास त्यांना वाटतो. मात्र यात तथ्य नसल्याचं समोर आलं आहे. एआयपीमध्ये प्रकाशित झालेल्या फिजिक्स ऑफ फ्ल्यूड्समध्ये संशोधकांनी मास्कबद्दलच्या बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष वेधलं आहे. तुम्ही मास्क घालत असाल, मात्र फिजिकल डिस्टन्सिंग पाळत नसाल, तर कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो, अशी माहिती संशोधनातून समोर आली आहे. संशोधकांनी विविध प्रकारच्या पाच मास्कचं परीक्षण केलं. मास्क घालून खोकल्यानंतर, शिंकल्यानंतर उडणारे शिंतोडे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात, याचा अभ्यास संशोधकांनी केला. मास्क परिधान केले असतानाही खोकल्यानंतर, शिंकल्यानंतर आसपासच्या व्यक्तींवर शिंतोडे उडतात. आसपासच्या व्यक्तींपर्यंत किती शितोंडे पोहोचतील, याची संख्या मास्कच्या दर्जावर अवलंबून असते. दोन व्यक्तींमध्ये ६ फुटांपेक्षा कमी अंतर असल्यास खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर तोंडातून बाहेर येणाऱ्या शिंतोड्यांमुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो. मास्क कोरोनापासून संरक्षण करतो. पण व्यक्ती एकमेकांच्या जवळ असल्यास मास्क घालता असतानाही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असतो, असं न्यू मेक्सिको स्टेट विद्यापीठाचे एसोशिएट प्रोफेसर कृष्णा कोटा यांनी सांगितलं. केवळ मास्कमुळे कोरोनापासून संरक्षण होणार नाही. तर त्यासोबत फिजिकल डिस्टन्सिंगचंदेखील पालन करावं लागेल, असं कोटा म्हणाले. टॅग्स :कोरोना वायरस बातम्याcorona virus