'या' गंभीर आजारांचं कारण आहे युरिक अ‍ॅसिडचं वाढतं प्रमाण, जाणून घ्या कसं नियंत्रणात ठेवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 12:32 PM2021-08-19T12:32:36+5:302021-08-19T13:18:10+5:30

लॉकडाऊनच्या या काळात आपली शारीरिक क्रिया कमी झाली आहे. दिवसभर बसून राहिल्याने त्याचा शरीरावर मोठा परिणाम होतो आणि युरीक अ‍ॅसिड वाढते. जर तुमच्या शरीरातील युरीक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढले असेल तर तुम्ही आताच तुमचा आहार बदलून योग्य पदार्थ सेवन करण्याची गरज आहे. चला जाणून घेऊया याबद्दलची सर्व माहिती!

आजकाल अनेक लोकांच्या शरीरात युरिक अ‍ॅसिड वाढण्याच्या तक्रारी जास्त झाल्या आहे. किडनीचे काम युरिक अ‍ॅसिड फिल्टर करून मुत्रावाटे बाहेर टाकणे. जेव्हा किडनी हे काम करू शकत नाही तेव्हा शरीरात युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते.

युरीक अ‍ॅसिडच्या वाढण्यामुळे गुडघ्यामध्ये बेजार करणाऱ्या वेदनेपासून ते संधीवात अशा अनेक समस्या उद्भवतात.

युरिक अ‍ॅसिड हा आपल्या शरीरातील नैसर्गिक कचरा आहे जो, रोज उत्पन्न होतो. तो प्युरिन नामक केमिकलमुळे उत्पन्न होतो जे पेशींच्या तुटण्यामुळे निर्माण होते.

युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे शक्य तितक्या पाण्याचं सेवन करणं. पाण्यामुळे युरिक अ‍ॅसिड पातळ होतं आणि युरिक अ‍ॅसिड मूत्रमार्गाद्वारे शरीरातून बाहेर पडतं.

ज्या व्यक्तींना युरीक अ‍ॅसिडची समस्या आहे त्यांनी प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारातील समवेश कमी करावा आणि फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करण्यास सुरुवात करावी. अर्थात असे पदार्थ खावेत ज्यात जास्त प्रमाणात फायबर असेल.

ड्रायफ्रुट्स मध्ये खास करून मखाना, खजूर आणि अक्रोड खावे. यातून जास्तीत जास्त फायबर शरीराला मिळेल.

युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण कमी करण्यासाठी वा ते संतुलित करण्यासाठी फळांचा ज्यूस, लिंबू पाणी, सफरचंदाचे व्हिनेगर यांचे सेवन सुद्धा उपयुक्त ठरते. यामध्ये जीवनसत्व 'क' ची विपुल मात्रा असते. शिवाय अँटी इंफ्लामेट्री गुण आणि अँटीऑक्सीडेंट्स सुद्धा या पदार्थांमध्ये आढळतात आणि हे सर्व पदार्थ युरिक अ‍ॅसिड कमी करण्यात महत्त्वाचे असतात.

मूग, मसूर, तूर पाण्यात हळद टाकून त्याचे सूप सेवन केल्यास उत्तम. मूग, मसूर, तूर, मटकी यांचे घट्ट वरण निषिद्ध असले तरी त्याचे शिजवलेले पातळ पाणी ऊर्जा देणारे असून या आजाराचा त्रास कमी करते.

ऑलिव्ह ऑईलनं बनवलेलं अन्न शरीरासाठी फायदेशीर आहे. यात भरपूर जीवनसत्त्व ई असते, ज्यामुळे युरिक अ‍ॅसिड कमी होतं.

केचअप, बिस्किट, चिप्स, चॉकलेट, टेट्रा पॅक ज्युस यामुळे युरिक अ‍ॅसिडचं प्रमाण वाढू शकतं.

काही लोकांचं असा समज आहे की, पालकच्या सेवनाने युरिक अ‍ॅसिडचं प्रमाण वाढतं पण पालकचं योग्य प्रमाणात सेवन केल्यास कोणताही अपाय होत नाही.

Read in English