रिकाम्यापोटी एक्सरसाइज करताय?; जाणून घ्या फायदे आणि तोटे! By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 12:33 PM 2019-07-05T12:33:57+5:30 2019-07-05T12:43:42+5:30
फिटनेससाठी जिममध्ये जाणं कोणतीही नवीन गोष्ट नाही. परंतु याबाबत अनेक प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाच्याच मनात येतात. त्यातील एक कॉमन प्रश्न म्हणजे, अनोशापोटी किंवा रिकाम्यापोटी एक्सरसाइज करावी की नाही? आज तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देणर आहोत. जाणून घेऊया अनोशापोटी एक्सरसाइज केल्याने होणारे फायदे आणि नुकसान या दोन्ही गोष्टींबाबत...
रिकाम्यापोटी एक्सरसाइज करण्याचे फायदे : काहीही न खाता एक्सरसाइज करण्याचे काही फायदे आहेत. जे शरीराला वेगवेगळ्या प्रकारे लाभदायक ठरू शकतं.
1. फॅट लवकर बर्न करण्यासाठी होते मदत रिकाम्यापोटी व्यायाम केल्याने शरीरामध्ये असणारे फॅट्स लवकर बर्न होण्यासाठी मदत होते. अने तज्ज्ञांच्या मते, यादरम्यान आपल्या शरीराला एनर्जीची गरज असते. अशावेळी शरीर फॅट्स बर्न करून एनर्जी प्रोड्यूस करतं.
2. पचनक्रिया सुधारते रिकाम्यापोटी एक्सरसाइज केल्याने शरीराची पचनशक्ती वाढण्यास मदत होते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, फास्टिंग दरम्यान वर्कआउट केल्याने वजन कमी होतं आणि पोटाच्या समस्या दूर होतात.
3. शरीराची ऊर्जा वाढवतं अनोशापोटी व्यायाम केल्याने शरीरातील फॅट्स वेगाने बर्न होण्यास मदत होते. एवढचं नाही तर शरीर लो ब्लड लेव्हलमध्ये काम करण्यासाठी तयार होतं. यामुळे तुमची वर्कआउट करण्याची क्षमता वाढते.
4. डोकं शांत राहतं काहीही न खाता वर्कआउट केल्याने शरीरामध्ये ग्लूकोज कमी होतं. याची कमतरता भरून काढण्यासाठी शरीर Hypoglycemia प्रोड्यूस करतं. जे मेंदूसाठी फायदेशीर ठरतं.
रिकाम्यापोटी व्यायाम केल्याने होणारं नुकसान : ज्याप्रमाणे रिकाम्यापोटी व्यायाम करण्याचे फायदे आहेत. त्याचप्रमाणे असं करण्याचे काही तोटेही आहेत.
1. वर्कआउट करण्याची क्षमता कमी होते अनोशापोटी वर्कआउट केल्याने शरीरामध्ये ग्लूकोजचे प्रमाण कमी होते. यानंतर शरीरकडे फॅट्स बर्न करून ऊर्जा प्रोड्यूस करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग शिल्लक राहत नाही. त्यामुळे याचा वर्कआउट करण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो. परिणामी तुम्हाला लगेच थकवा जाणवतो.
2. Muscles कमी होतात बरेच दिवस अनोशापोटी व्यायाम केल्याने तुमच्या Muscles कमी होतात. त्यामुळे अनेकदा तज्ज्ञ यापासून बचाव करण्यासाठी एक्सरसाइज करण्याआधी 30 मिनिटं आधी प्रोटीन खाण्याचा सल्ला देतात.
3. After burn ची समस्या होऊ शकते काहीही न खाता वर्कआउट केल्याने After burn ची समस्या होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये शरीर एक्सरसाइजनंतरही अधिक कॅलरी बर्न करू लागतं आणि ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागते.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.