Microplastics Alert: सावधान! शरीरात जाणाऱ्या मायक्रोप्लॅस्टिकचे स्रोत सापडले; तुम्ही म्हणाल, हे तर काहीच नाही... By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 04:14 PM 2022-04-21T16:14:23+5:30 2022-04-21T16:21:05+5:30
how Microplastics enter in Human Body? मायक्रोप्लॅस्टिक मानवाच्या शरीरात पहिल्यांदाच सापडल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. हे मायक्रोप्लॅस्टिक तज्ज्ञांना लोकांच्या रक्तात सापडले होते. पण ते गेले कसे? स्रोत मायक्रोप्लॅस्टिक मानवाच्या शरीरात पहिल्यांदाच सापडल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. हे मायक्रोप्लॅस्टिक तज्ज्ञांना लोकांच्या रक्तात सापडले होते. ते एका जागी साचले किंवा फुफ्फुसात साचले तर आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.
आता प्रश्न हा उरतो की आपल्या शरीरात हे मायक्रोप्लॅस्टिक कसे जाते? ते कितपत नुकसान पोहोचवू शकतात, यावर पुढे संशोधन सुरु झाले आहे. तज्ज्ञांनुसार हे सुक्ष्म कण फुफ्फुसांमध्ये तसेच राहू शकतात आणि नुकसान पोहोचवू शकतात. यामुळे फुफ्फुसांचे आजार असलेल्या लोकांना त्रास होऊ शकतो.
मायक्रोप्लॅस्टिकचे कण फुफ्फुसांमध्ये बराच काळ राहिले तर त्यामुळे सूज येऊ शकते. तसेच तो कण किती मोठा आहे,यावरही काही गोष्टी अवलंबून असतील. हे मायक्रोप्लॅस्टिक कोणत्या कोणत्या वस्तूंमधून आपल्या शरीरात जाऊ शकते, याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
सायन्स ऑफ द टोटल एन्व्हायर्नमेंटमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या अभ्यासात खालच्या फुफ्फसासह त्याच्या अन्य भागांमध्येही मायक्रोप्लॅस्टिक आढळले आहे. शोधकांनी 12 प्रकारचे प्लास्टिक शोधले आहे. यामध्ये पॉलीप्रोपीलीन, पॉलीथिलीन आणि टेरेफ्थालेट यांचा समावेश आहे.
या प्रकारचे प्लॅस्टिक पॅकेजिंग, बाटल्या, कपडे, दोरी आणि दोरे बनविण्यासाठी वापरले जाते. मायक्रोप्लास्टिक्सच्या सर्वात धोकादायक स्त्रोतांमध्ये शहरातील धूळ, कापड आणि टायर यांचा समावेश होतो.
अनेक खाद्यपदार्थ आणि पेयेही शरीरात मायक्रोप्लास्टिक्स पाठवत आहेत. टलीबंद पाणी, मीठ, सीफूड, टीबॅग, तयार अन्न आणि डबाबंद पदार्थांचा समावेश आहे.
प्लॅस्टिकचे कण फुफ्फुसाच्या पेशींचे नुकसान करतात. यामुळे कर्करोग, दम्याचा विकार आदी आजार अद्भवू शकतात. पॉलिस्टर आणि नायलॉन तंतूंमधून बाहेर पडलेल्या कणांमुळे कापड उद्योगातील कामगारांना खोकला, धाप लागणे आणि फुफ्फुसाची क्षमता कमी होण्यासारखे आजार जडतात.