Mosquitos Bite Secret: कोणाला चावायचे कोणाला नाही, हे कसे ठरवतो मच्छर; जाणून घ्या त्यामागचे रहस्य...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 01:48 PM2022-03-17T13:48:59+5:302022-03-17T13:59:28+5:30

तुम्ही एक गोष्ट नोटीस केलीय का? मच्छर एखाद्या व्यक्तीला जास्त चावतात, एखाद्याला फार कमी.... असे का? कोडेच आहे ना....

सूर्य तापू लागला आहे. तसे तो तापलेलाच असतो, परंतू होळी आली की पृथ्वीवर त्याचा ताप वाढू लागतो. याचबरोबर हळूहळू मच्छरदेखील तुमच्या मागे-पुढे, वर-खाली गुणगुणकरू लागतात. बसलेले असताना किंवा झोपलेले असताना हळूच चावा घेतात आणि रक्त पितात. तुम्ही एक गोष्ट नोटीस केलीय का? मच्छर एखाद्या व्यक्तीला जास्त चावतात, एखाद्याला फार कमी.... असे का? कोडेच आहे ना....

मच्छर कोणाला चावायचे आणि कोणाला नाही हे ठरवतो. यामुळे ते एखाद्या व्यक्तीला जास्त चावतात, एखाद्या व्यक्तीला कमी. यावेळी ते कोण कमजोर कोण ताकदवान हे पाहत नाहीत.

मादा मच्छर रक्त शोषून घेते, नर मच्छर तसे करत नाही. म्हणजेच आपल्याला चावणाऱ्या या मच्छर बहुतांश या मादा असतात. त्या ठरवितात कोणत्या व्यक्तीला चावायचे, कोणत्या नाही. विज्ञानाने याचा शोधही लावला आहे. जाणून घ्या...

वैज्ञानिकांनी संशोधनानंतर मादा मच्छर कोणाला चावायचे हे ठरविण्यासाठी वास आणि नजरचा वापर करते. आपण श्वास सोडताना कार्बन डायऑक्साइड (CO2) सोडतो, त्याचा एक गंध येतो. त्याचा वास घेत घेत मच्छर तुमच्यापर्यंत पोहोचतो. जवळ आल्यावर ती नजरेचा वापर करते.

मादा मच्छरांमध्ये १०० फूट लांबूनच गंध शोधण्याची क्षमता असते. आपण दर सेकंदाला जेवढी हवा श्वासातून सोडतो त्यात ५ टक्के कार्बन डायऑक्साईजड असते. त्याचा वास लागताच त्या दिशेने मच्छर वेगाने झेपावते.

एका संशोधनात असेही आढळून आले आहे की, डास इकडे तिकडे फिरणाऱ्या गोष्टींकडे जास्त आकर्षित होतात. परंतु ते कार्बन डायऑक्साइडपेक्षा कमी प्रमाण असते.

मादी डास आपल्याला शोधतात कारण ते मानवी वासाचे वेगवेगळे घटक ओळखण्यास सक्षम असतात. या वासांच्या साहाय्याने डास जेव्हा आपल्या जवळ येतात तेव्हा त्यांना आपल्या शरीरातील उष्णतेने आपला ठावठिकाणा कळतो.

संशोधनामुळे डासांना आपल्यापासून दूर ठेवण्याचा मार्गही समजला. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, मादी डासांमध्ये वास घेण्याची क्षमता संपुष्टात आली तर आपण डास चावण्यापासून वाचू शकतो.

मग आपण मलेरिया, झिका विषाणू आणि डेंग्यू इत्यादी डास चावल्यामुळे होणाऱ्या आजारांपासूनही वाचू. तथापि, मादी डास केवळ त्यांच्या वास घेण्याच्या क्षमतेमुळे आपल्याला ओळखू शकत नाहीत, म्हणून त्यांच्या इतर ओळखण्याच्या क्षमतेवर हल्ला करून ते वाचविले जाऊ शकते.