Coronavirus: कोरोना लस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी; नव्या रिपोर्टनं वाढलं टेन्शन, पण तज्ज्ञ म्हणतात, चिंता नको By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 02:24 PM 2021-07-19T14:24:58+5:30 2021-07-19T14:32:03+5:30
Corona vaccination: गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट उभं राहिलं आहे. या संकटातून वाचण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण मोहिमेवर भर दिला जात आहे. सध्या कोरोनापासून बचावासाठी लसीकरण मोहिमेवर अनेक देशांनी भर दिला आहे. जगभरातील वैज्ञानिक लस घेण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करत आहेत. लसीकरण केल्यानंतर कोरोना महामारी नियंत्रणात येईल असा विश्वास वाटत आहे. परंतु पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या नव्या रिपोर्टनंतर अनेकजण चिंता व्यक्त करत आहेत. या रिपोर्टममध्ये नेमकं काय आहे जाणून घेऊया..
PHE च्या रिपोर्टनुसार, UK मध्ये लस न घेतलेल्यांच्या तुलनेत लसीकरण झालेल्या व्यक्तीचे कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. १ फेब्रुवारी ते २१ जूनपर्यंत कोविडच्या डेल्टा व्हायरसच्या संक्रमणामुळे २५७ लोकांचा मृत्यू झाला. या २५७ पैकी १६३ रुग्णांनी लसीचे दोन तर काहींनी एक डोस घेतला होता.
पहिल्या नजरेत ही रिपोर्ट आश्चर्चकारक वाटू शकते. परंतु तज्ज्ञांच्या मते, जशी अपेक्षा होती तेच घडत आहे. प्रत्येकाने लसीचे दोन्ही डोस घेतले तरी सर्व लोकांचे आयुष्य वाचवू शकत नाहीत हेच समजा.
तज्ज्ञ म्हणतात की, लस घेतल्यानंतर कोरोना संक्रमित झालेल्या काही लोकांचा मृत्यू होऊ शकतो. त्याचा अर्थ लस प्रभावी नाही अथवा मृत्यूचा धोका कमी करत नाही असं नाही. जास्त वय असलेल्या लोकांचा कोरोनामुळे मृत्यूचा धोका दुप्पट आहे. म्हणजे लस न घेतलेला ३५ वर्षीय व्यक्तीच्या तुलनेत ७० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका ३२ पट अधिक आहे.
आकड्यानुसार, लस घेतल्यानंतरही युवकांच्या तुलनेत वृद्ध व्यक्तींना कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका कायम आहे. PHE डेटानुसार, कोरोना लसीच्या दोन्ही डोसनंतर डेल्टा व्हेरिएंटने संक्रमित झाल्यास हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा धोका ९६ टक्के कमी होतो
डेटानुसार, असा अंदाज वर्तवला जात आहे की, कोरोना लस हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा धोका कमी करत असला तरी मृत्यूपासून पूर्णपणे वाचवू शकत नाही. विशेषत: वयोवृद्ध लोकांना धोका अधिक आहे. तरीही आधीपासून आजारी असलेले लस न घेतलेल्यांच्या तुलनेत दोन्ही डोस घेणारे आजारी व्यक्तींना मृत्यूचा धोका सर्वात कमी आहे.
डेटानुसार, लस घेतल्यानंतर ३५ वर्षीय व्यक्तीच्या तुलनेत ७० वर्षीय व्यक्तीला मृत्यूचा धोका आहे. परंतु कोरोनाचा धोका अद्यापही सर्व वयोगटातील लोकांना कायम आहे. डेटानुसार ७० वर्षीय कोणत्या व्यक्तीने जर लसीचा दोन्ही डोस घेतला तरीही ३५ वर्षीय व्यक्ती ज्याने लस घेतली नाही त्याच्या तुलनेत कोरोनामुळे मृत्यूचा धोका ७० वर्षीय व्यक्तीला जास्त असेल
परंतु हा डेटा सध्याच्या वर्तमान स्थितीत फिट बसत नाही. कारण दुसऱ्या लाटेत वृद्धांच्या तुलनेत कोरोनाने युवकांना जास्त संक्रमित केले. अशावेळी लस न घेतलेल्या युवकांना कोरोनामुळे मृत्यूचा धोका सर्वाधिक आहे.
तज्ज्ञ सांगतात की, कोणतीही लस मृत्यूच्या धोक्यापासून पूर्णपणे वाचवू शकत नाही. परंतु हा धोका कमी करू शकते. कोरोना व्हेरिएंटच्या संक्रमणापासून लस प्रभावी आहे. त्यासाठी प्रत्येकाला सुरक्षेसाठी लसीचे दोन्ही डोस घेणं गरजेचे आहे.
लस घेतल्यानंतरही कोरोनाचा धोका पहिल्या तुलनेत कमी होतो परंतु कोरोना संक्रमित करू शकतो. त्यासाठी लस घेतल्यानंतरही कोरोना नियमावलींची पालन करणं आवश्यक आहे. लस घेतल्यानंतरही सोशल डिस्टेंसिंग, मास्क आणि हात धुणे या नियमांचे पालन करावे असं तज्त्र म्हणतात.