Namita Thapar : "इतकं ब्लीडिंग झालं की इंजेक्शन्स घ्यावे लागले"; नमिता थापर यांनी व्यक्त केलं 'ते' दु:ख

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 02:31 PM2024-03-05T14:31:08+5:302024-03-05T14:44:39+5:30

Namita Thapar : नमिता थापर शार्क टँकच्या सीझन 2 मध्ये जज म्हणून पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान त्यांनी एका एपिसोडमध्ये आपल्या मनातील दु:ख व्यक्त केलं आहे.

Emcure च्या फाऊंडर नमिता थापर शार्क टँकच्या सीझन 2 मध्ये जज म्हणून पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान त्यांनी एका एपिसोडमध्ये आपल्या मनातील दु:ख व्यक्त केलं आहे.

नमिता थापर म्हणाल्या की, "माझ्या बाबतीत, मला माझ्या मासिक पाळीच्या दरम्यान कधीही कोणतीही समस्या आली नाही. त्यामुळे मी नेहमीच स्वत:ला भाग्यवान समजत होते."

"पण पेरीमेनोपॉजचा फार त्रास झाला. लोकांना वाटतं की, अरे हे तर टीनएजर्स किंवा यंगर वुमनसाठी आहे. पण तसं नाही. माझा पेरीमेनोपॉज सुरू झाला."

"कधी कधी तर इतकं हेवी ब्लीडिंग होतं की शार्क टँकच्या शूटमध्ये बसण्यासाठी देखील त्रास होतो. मी एवढी अशक्त झाले की माझं हिमोग्लोबिन थेट 8 वर आलं होतं"

"मला पाच महिने इंजेक्शन घ्यावे लागले. या संपूर्ण प्रक्रियेला 45 मिनिटे लागली. म्हणूनच मी आज इथे बसले आहे. एका महिलेच्या प्रॉडक्टिव्हीटीमध्ये इतक्या समस्या असू शकतात."

नमिता यांनी हा व्हि़डीओ स्वतः हा देखील शेअर केला आहे. महिला अनेकदा आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. मी शार्क टँक इंडियाच्या प्लॅटफॉर्मचा एक माध्यम म्हणून वापर केला असं म्हटलं आहे.

"जेणेकरून मानसिक आरोग्य, IVF, फिटनेस आणि पेरीमेनोपॉजबद्दल बोलू शकेन. तुमची मासिक पाळी थांबण्याच्या 2 ते 10 वर्षे आधी पेरीमेनोपॉज सुरू होतो. बहुतेकदा हे 40 वर्षांच्या स्त्रियांना होतं."

"तुम्हाला झोप येणार नाही, मूड स्विंग्स होतील, भूक लागणार नाही. अनेक महिलांच्या बाबतीत हे घडतं पण त्या लक्ष देत नाहीत. हा अत्यंत कठीण काळ होता" असं नमिता यांनी म्हटलं आहे.