Neminath homeopathic medical college claims to make corona virus medicine myb
ब्रायोनिया एल्वा-२०० या औषधाने ७ दिवसात कोरोनाचे रुग्ण होणार ठणठणीत बरे; पहिली चाचणी यशस्वी By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 12:09 PM2020-05-25T12:09:50+5:302020-05-25T12:21:52+5:30Join usJoin usNext कोरोना विषाणूंमुळे जगभरात भीतीचं वातावरण तयार झालं आहे. कोरोनाचं संक्रमण होत असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी मोठ्या प्रमाणावर लोक कोरोनातून बरे होत आहेत. कोरोनावर अद्याप कोणतीही लस किंवा औषध प्राप्त झालेलं नाही. सर्वच देशातील संशोधकांच्या लसीवर आणि औषधांवर चाचण्या सुरू आहेत. तर काही चाचण्या या शेवटच्या टप्प्यातही पोहोचल्या आहेत. आग्रा येथील नेमिनाथ होमिओपेथिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटरने कोरोना विषाणूंच औषध ब्रायोनिया एल्वा-200 विकसीत करण्याचा दावा केला आहे. कोरोना विषाणूंनी संक्रमित असलेले रुग्ण या औषधांनी पाच ते सात दिवसात बरे होऊ शकतात असा दावा केला जात आहे. या औषधांबाबतचा अहवाल सेंट्रल रिसर्च काउंसिल ऑफ होमिओपेथीद्वारे सरकारला पाठवण्यात आला आहे. इंडियन मेडिकल रिसर्च सेंटर (आईसीएमआर) ला सुद्धा यासंबंधी अहवाल पाठवला आहे. आयसीएमआरकडून ५ मे ला परवागनी मिळाल्यानंतर कोरोना रुग्णांसाठी औषध तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या औषधाचे नाव ब्रायोनिया एल्वा-200 ठेवण्यात आले आहे. या औषधाच्या चाचणीच्या पहिल्या टप्प्यात टूंडलामधील एफएच मेडिकल कॉलेजमधील ४२ रुग्णांवर परिक्षण करण्यात आलं होतं. रुग्णांवर करण्यात आलेलं परिक्षण सफल ठरलं. या रुग्णांचं वय १० ते ६५ या दरम्यान होतं. दोन ते तीन दिवसात रुग्णांमधील सर्दी, खोकला, ताप यांसारखी लक्षणं कमी होत गेली. ४० रुग्णांना सात दिवसांपर्यंत हे औषध देण्यात आले होते. पाच ते सात दिवसात तपासणी केल्यानंतर रोगप्रतिकारकशक्तीची तपासणी करण्यात आली. त्यानंतर कोरोना विषाणूंची चाचणी निगेटिव्ह दिसून आली. अजून दोन रुग्णांचे रिपोर्ट अद्याप आलेले नाहीत नेमिनाथ होमिओपेथिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रदीप गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार या औषधांच्या सेवनाने कोरोनाचे रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी जाऊ शकतात. या औषधांचे परिक्षण यशस्वी झाल्यानंतर सेंट्रल रिसर्च काउंसिल ऑफ होमिओपेथीमध्ये पाठवण्यात आलं आहे. महत्वाचं म्हणजे हे औषध निशुल्क उपलब्ध करून दिलं जाणार आहे. दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. हे औषध निशुल्क उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आाला आहे. प्राचार्यांनी दिलेल्या माहितीनुसार २०० रुग्णांवर परिक्षण सुरू आहे. तीन महिन्यांपर्यंत हा शोध सुरू राहणार आहे. सध्या ४२ रुग्णांवर परिक्षण करण्यात आलं आहे. २०० रुग्णावरचे परिक्षण पूर्ण झाल्यानंतर अहवाल सरकारला पाठवण्यात येणार आहे. प्राचार्यांनी सांगितले की, या औषधाचे सकारात्मक परिणाम आल्यामुळे या औषधाचा वापर करण्यासाठी एसएन मेडिकल कॉलेजचे प्राचार्य आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये होमिओपेथी औषधाचा कोरोनाच्या उपचारांसाठी वापर केला जावा. असं नमुद करण्यात आलं आहे. टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्याकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newscorona virus