तुमच्या मुलांना तुम्ही चहा-बिस्किट देता का?; होऊ शकतं मोठं नुकसान, पालकांनो व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 02:14 PM2024-07-01T14:14:47+5:302024-07-01T14:35:53+5:30

मुलांना चहा-बिस्किट देऊ नयेत, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. यामुळे मुलांच्या आरोग्याचं मोठं नुकसान होऊ शकतं.

लहान मुलांना योग्य आहार दिला तरच त्यांची वाढ योग्य आणि उत्तम प्रकारे होऊ शकते. पण आजकाल पालकच आपल्या मुलांना चहा-बिस्किट देत असल्याचं अनेकदा दिसून येतं. आई-वडील खात असल्याने मुलांना देखील तेच हवं असतं.

मुलांना चहा-बिस्किट देऊ नयेत, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. यामुळे मुलांच्या आरोग्याचं मोठं नुकसान होऊ शकतं. त्यांना आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. चहा-बिस्किट का देऊ नये यामागची कारणं जाणून घेऊया....

बिस्किटं मैद्यापासून बनवली जातात ज्यामध्ये साखर आणि पाम तेल देखील असतं. साखर आणि पाम तेल मुलाच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतं.

मुलांचं यामुळे पोट भरू शकतं परंतु त्यांना कोणतंही पोषकतत्व मिळत नाही. बिस्किटांमध्ये प्रिजर्वेटिव्स कमर्शियल असतात, जे शरीरातील रक्त खराब करू शकतात.

तसेच बिस्किटांमध्ये सोडियम बेंजोएट देखील असते ज्यामुळे डीएनएचं काही प्रमाणात नुकसान होऊ शकतं.

बिस्किटांमध्ये वेगवेगळे फ्लेवर्स देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टींमुळे फुफ्फुसाचे आजार निर्माण होऊ शकतात आणि मेंदूचं देखील नुकसान होऊ शकतं.

चहा प्यायल्याने मुलांमध्ये जास्त प्रमाणात अस्वस्थता, झोप न येणं आणि आयर्न एब्जॉर्ब्शनमध्ये अडथळा निर्माण होतो.

चहामध्ये साखर मिसळली जाते जो हाय कॅलरी डाएट आहे, यामुळे लठ्ठपणा वाढतो जो मुलांच्या आरोग्यासाठी चांगला नाही.

जर तुमचं मूल वारंवार खूप जास्त साखर असलेला चहा पीत असेल तर रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो.

चहा प्यायल्याने मुलांच्या पचनसंस्थेवर खूप वाईट परिणाम होतो, त्यामुळे बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅसचा धोका देखील वाढतो.