वैज्ञानिकांची कमाल! शोधला मानवी शरीरातील एक नवीन अवयव, 'असा' होईल फायदा By manali.bagul | Published: October 22, 2020 12:13 PM 2020-10-22T12:13:14+5:30 2020-10-22T12:23:13+5:30
वैज्ञानिकांनी मानवी शरीरातील एका अनोख्या अवयवाचा शोध लावला आहे. नेदरलँडच्या वैज्ञानिकाने प्रोस्टेट कॅन्सरची तपासणी आणि उपचार करत असताना मानवी शरीराच्या एका नव्या अवयवाचा शोध लावला आहे.
संशोधकांना दिसून आलं ही, गळ्याच्या वरच्या भागातील ग्रंथीमध्ये एक अवयव आहे. या अवयवाबद्दल अजूनही पूर्ण माहिती मिळालेली नाही.
मानवी शरीरात आढळून आलेल्या या अवयवाला वैज्ञानिकांनी Tubarial salivary glands ट्यूबारिअल सलायवरी गॅल्ड्स असं नाव दिलं आहे. वैज्ञानिकांनी दिेलेल्या माहितीनुसार शरीरातील हा अवयव ल्यूबरिकेशन या क्रियेसाठी फायदेशीर ठरतो.
Radiotherapy and Oncology जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार रेडिएशन टीटमेंट करताना या ग्रंथींना प्रभावित केले नाही तर यामुळे लोकांना फायदा होऊ शकतो.
नेदरलँडच्या एम्सटर्डम कॅन्सर इंस्टीट्यूटचे तज्ज्ञ प्रोस्टेट कॅन्सरची तपासणी करण्यसाठी PSMA PET-CT स्कॅनचे परिक्षण करत होते. यादरम्यान आता डॉक्टरर्सनी एक रेडियओएक्टीव्ह ट्रेसरला मानवी शरीरात इंजेक्ट केले होते. रेडिओएक्टीव्ह ट्रेसरमुळे या नवीन अवयवाचा शोध लागला.
वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रंथीच्या समुहाद्वारे कळून आले की, हा नवीन अवयव १.५ इंचाचा आहे. लाळग्रंथींप्रमाणे हा अवयव काम करतो. या अभ्यासादरम्यान ज्या १०० रुग्णांची तपासणी करण्यात आली त्या सगळ्याच रुग्णांमध्ये हा नवीन अवयव होता. (Image Credit: ctvnews, aajtak)