A new virus is killing wild rabbits in america during corona virus myb
आता सशांमध्येही पसरला जीवघेणा व्हायरस; घाबरु नका, माणसांवर परिणाम नाही By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 05:48 PM2020-05-20T17:48:04+5:302020-05-20T17:59:20+5:30Join usJoin usNext कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार पसरलेला असताना आता कोरोनाशी जोडलेले नवनवीन आजार समोर येत आहेत. कोरोनाच्या माहामारीने हाहाकार पसरवलेला असताना आता अमेरिकेत नव्याच आजाराने थैमान घातलं आहे. हा जीवघेणा व्हायरस माणसांना नाही सश्यांना होत आहे. या व्हायरसची लागण झाल्यामुळे जंगली सश्यांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत आहे. मार्चमध्ये न्यू मॅक्सिकोतून पसरलेला हा व्हायरस टेक्सास, एरिजोना, कोलोराडो, नेवाडा, कॅलिफोर्निया आणि मैक्सिकोमध्ये पसरला आहे. जंगली सश्यासोबतच पाळीव सश्यांसाठी सुद्धा व्हायरस धोका पोहोचवत आहे. हा आजार सश्याच्या हेमोरोजिक डिसीज़ वायरस टाइप-2 मुळे होतो. हा आजार माणसांमध्ये आणि इतर प्राण्यांमध्ये पसरत नाही. यूएसच्या कृषी विभागाचे प्रमुख यांनी सांगितले की, हा व्हायरस कोरोना व्हायरस नसून ससा किंवा सश्याप्रमाणे असलेल्या प्राण्यांना होतो. उत्तर अमेरिकेतील सश्यांवर पहिल्यांदाच व्हायरसचा मोठा हल्ला झाला आहे. या आधी वॉशिंग्टन आणि न्यूयॉर्कच्या पाळीव सश्यांना लहान मोठ्या व्हायरसचं संक्रमण झालं होतं. कॅनडातील जंगली सश्यासोबत सुद्धा असा प्रकार झाला आहे. हे पाळीव आणि जंगली सशे मुळेचे उत्तर अमेरिकेतील नसून यांच्या प्रजती युरोपियन आहेत. न्यू मॅक्सिकोतील पशु वैद्यकिय तज्ञ सल्फ जिम्मेरमान यांनी दिलेल्या माहितीनुसार सश्यांमध्ये पसरत असलेल्या या व्हायरसबाबत काहीही माहिती प्राप्त झालेली नाही. पण इतर प्रदेशातून आणलेले सशे हा व्हायरस पसरण्यामागचे कारण ठरू शकतात. या आजाराबाबत २०१० मध्ये फ्रान्समध्ये पहिल्यांदा या आजाराबाबत लक्षणं दिसून आली होती. त्यानंतर युरोप आणि ऑस्टेलियामध्ये ही माहामारी दीड वर्ष राहिली. जिम्मेरान यांनी सांगितले की, युरोपीयन सश्यांची तस्करी झाल्यामुळे व्हायरसचा प्रसार झाला आहे. जास्तीत जास्त सशे मेल्यानंतर त्यांना बाहेर फेकण्यात आलं त्यातून व्हायरस पसरला. सश्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्यामुळे व्हायरसचं संक्रमण झाल्यानंतर ते जीवंत राहू शकत नाहीत. या व्हायरसचं मुळ रुप आरएचडव्ही आहे. जो व्हायरस १९८४मध्ये चीनमधून पसरला होता. व्हायरस घरगुती सश्यांसाठी घातक ठरू शकतो. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत जवळपास ३० लाख घरांमध्ये ६७ पाळीव सशे आहेत. या आजारावर लस सुद्धा विकसित केली आहे. टॅग्स :आंतरराष्ट्रीयआरोग्यInternationalHealth