Omicron: सावधान, ओमायक्रॉन देऊ शकतो चकमा; हलक्यात घेऊ नका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 12:06 IST2022-01-09T12:02:18+5:302022-01-09T12:06:35+5:30
omicron corona virus may be Turn Dangerous: गेल्या आठवडाभरात देशात कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड गतीने वाढू लागली आहे. डेल्टाएवढा हा व्हेरिएंट खतरनाक नसला तरी त्याच्या संसर्गाच्या झपाट्याने सर्वजण अवाक झाले आहेत.

ओमायक्रॉन झपाट्याने आपले हातपाय पसरू लागला आहे. गेल्या आठवडाभरात देशात कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड गतीने वाढू लागली आहे. डेल्टाएवढा हा व्हेरिएंट खतरनाक नसला तरी त्याच्या संसर्गाच्या झपाट्याने सर्वजण अवाक झाले आहेत. आपल्याला आशादायी चित्र दिसेल. पाहूया आकडेवारी काय सांगते...
यांनाही होऊ शकतो कोरोना
गेल्या २४ तासांत जगभरात २७ लाख कोरोनाबाधित आढळून आले आहेत. ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.
त्यातच आता कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्यांना ओमायक्रॉनची बाधा होऊ शकते, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. ओमायक्रॉन रोगप्रतिकारक शक्तीला सहजपणे चकमा देऊ शकतो, असेही जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.
पाचपट आहे धोका
ज्यांना कोरोनाची बाधा आधी होऊन गेली आहे त्यांना डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनचा धोका पाचपट आहे. याचे कारण म्हणजे रोगप्रतिकार शक्ती ओमायक्रॉनला सहजपणे ओळखू शकत नाही.
ओमायक्रॉनमध्ये उपस्थित असलेल्या काही म्युटेशन्समुळे रोगप्रतिकार शक्तींचा गोंधळ उडतो. त्यामुळे प्रादुर्भावाचे प्रमाण वाढते.
नियमांचे काटेकोर पालन गरजेचे
ओमायक्रॉनपासून बचाव करायचा असेल तर कोरोनानियमांचे काटेकोर पालन होणे गरजेेचे आहे.
लसीकरण करणे, चाचण्यांचा वेग वाढवणे, काँटॅक्ट ट्रेसिंग करणे इत्यादींना प्राधान्य दिले जावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आरोग्य यंत्रणांना या संकटकाळात नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक असून चाचण्यांसाठी स्वत:हून पुढाकार घ्यावा, असे आवाहनही तज्ज्ञांनी केले आहे.