Omicron व्हेरिएंटवर स्टडी रिपोर्ट; संशोधकांच्या दाव्यानं पुरुषांचं टेन्शन वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 10:35 AM2021-12-21T10:35:14+5:302021-12-21T10:40:45+5:30

कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे अनेक देशांची चिंता वाढली आहे. ब्रिटननंतर आता अमेरिकेत ओमायक्रॉन रुग्णाचा पहिला मृत्यू झाला आहे. भारतातही ओमायक्रॉन व्हेरिएंटनं शिरकाव केला असून १७० पेक्षा जास्त ओमायक्रॉन रुग्ण देशात आढळले आहेत.

दक्षिण आफ्रिकेत मिळालेल्या सुरुवातीच्या डेटानुसार, कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत कमी धोकादायक आहे. परंतु तो अधिक वेगाने संक्रमित करणारा आहे. परंतु नवीन स्टडी रिपोर्ट या दाव्याला फेटाळून लावतं. UK स्टडीनुसार, ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टापेक्षा कमी धोकादायक नाही.

ही स्टडी इंपिरियल कॉलेज लंडनच्या संशोधकांनी केली आहे. ओमायक्रॉन संक्रमित ११ हजार ३२९ रुग्णांची तुलना कोरोनाच्या अन्य व्हेरिएंटने संक्रमित २ लाख रुग्णांसोबत केली आहे. डेल्टापेक्षा ओमायक्रॉन कमी धोकादायक असल्याचे कुठलेही पुरावे नाहीत. ही तुलना रुग्णांच्या लक्षण आणि हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णसंख्येवरुन करण्यात आली आहे.

स्टडीनुसार, ओमायक्रॉन लक्षण असणाऱ्या रुग्णांवर दोन डोस घेतल्यानंतर ० ते २० टक्के आणि बूस्टर डोस घेतल्यानंतर ५५ ते ८० टक्के परिणाम दिसून येत आहे. डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन व्हेरिएंटचं रि इंफेक्शनचा धोका ५.४ पटीने अधिक आहे.

हेल्थकेयर वर्कर्सनुसार, SARS COv2 च्या पहिल्या संक्रमणानंतर ६ महिन्यात दुसऱ्या संक्रमणाआधी ८५ टक्के सुरक्षा मिळत होती. ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या रि इंफेक्शनविरोधात सुरक्षा १९ टक्के कमी होताना आढळत आहे.

कोविड १९ मधून बरे झाल्यानंतर स्पर्म क्वालिटी अनेक महिन्यापर्यंत खराब राहते. संशोधकांच्या म्हणण्यानुसार सीमेन स्वत:मध्ये संक्रमित होत नाही. ३५ पुरुषांवर केलेल्या स्टडीत आढळलं की, कोरोनातून बरे झाल्यानंतर १ महिन्यानंतर स्पर्म ६० टक्के आणि स्पर्म काऊंट ३७ टक्क्यांनी घटतो

ही स्टडी फर्टिलिटी अँन्ड स्टेरिलिटीमध्ये प्रकाशित झाली आहे. कोविड १९ संक्रमणाचं गांभीर्य आणि शुक्राणूंची वैशिष्ट्ये यात काहीही संबंध नाही. प्रेंग्नेंसीची इच्छा ठेवणाऱ्या जोडप्यांना संशोधकांनी इशारा दिलाय की, कोविड १९ संक्रमणानंतर काही काळ स्पर्मच्या गुणवत्तेत कमी येऊ शकते.

जगातील बहुतेक देशांची लसीकरण मोहीम या लसींवर आधारित असल्याने महामारीच्या नवीन लाटेचा प्रभाव व्यापक असू शकतो. जगातील कोट्यवधी लोकांचं लसीकरण करण्यात आलेलं नाही. अशा परिस्थितीत ओमायक्रॉनच्या संसर्गाचा धोका वाढल्यानं नवीन व्हेरिएंट उदयास येण्याचा धोका वाढतो.

ब्रिटनमध्ये केलेल्या एका स्टडीनुसार ओमायक्रॉनची काही लक्षणं आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यात ओमायक्रॉन संक्रमित रुग्णांच्या नाकातून पाणी येणे, डोकेदुखी, थकवा, गळा सुकणे, यासारख्या लक्षणांचा समावेश आहे. त्यामुळे ओमायक्रॉनच्या लक्षणांत सामान्य सर्दीचाही समावेश होतो

ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या लक्षणांबाबत नुकताच नवा खुलासा लोकांची चिंता वाढवणारा ठरला. कारण ही सगळी लक्षणं सामान्य सर्दीत दिसून येतात. त्यामुळे ओमायक्रॉन असूनही लोकं सामान्य सर्दी समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. तसेच नकळत इतरांना ओमायक्रॉनचं संक्रमण पसरवतात.