कोरोनाचा नवा व्हेरिएंट धोकादायक! आतापर्यंतच्या सर्व स्ट्रेनपेक्षा पूर्णपणे भिन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 11:23 AM2022-04-06T11:23:13+5:302022-04-06T11:38:41+5:30

Corona Pandemic : सुरुवातीच्या तपासात असे आढळून आले आहे की, नवीन व्हेरिएंट आतापर्यंतच्या सर्व कोरोना व्हेरिएंटपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे.

नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरिएंटने (New Omicron subtype detected in China)पुन्हा एकदा स्थिती बिघडली आहे. कोरोना संक्रमितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या धोक्यादरम्यान, या व्हायरसचा एक नवीन व्हेरिएंट समोर आला आहे, जो आतापर्यंतच्या सर्व स्ट्रेनसोबत जुळत नाही आणि सुरुवातीच्या तपासणीत त्याची लक्षणे देखील जुन्या व्हेरिएंटपेक्षा पूर्णपणे भिन्न (New Variant different from XE) आहेत.

दरम्यान, या व्हेरिएंटमुळे चीनमध्ये कोरोनाची परिस्थिती अनियंत्रित होत आहे, असे म्हटले जात आहे. ग्लोबल टाइम्सच्या मते, चीनमध्ये कहर करणाऱ्या कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचा (Omicron) सबव्हेरिएंट BA.1.1 हा आहे.

सुरुवातीच्या तपासात असे आढळून आले आहे की, नवीन व्हेरिएंट आतापर्यंतच्या सर्व कोरोना व्हेरिएंटपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. आतापर्यंत माहित असलेली एकच गोष्ट म्हणजे ओमायक्रॉन सबव्हेरिएंट BA.1 च्या कुटुंबातून आला आहे.

चीनमधील सर्वात मोठे शहर शांघायच्या सीमेला लागून असलेल्या पूर्व चीनच्या सुझोउ प्रांतात (सुझोऊ) कोरोनाचा एक नवीन व्हेरिएंट दिसल्याचे अहवालात आढळून आले आहे. ओमायक्रॉनच्या सबव्हेरिएंट BA.1.1 प्रकरणानंतर या प्रदेशात एक नवीन धोका निर्माण झाला आहे.

याशिवाय शांघायपासून अवघ्या 70 किमी अंतरावर असलेल्या चीनच्या जिआंगसू प्रांतात हा व्हेरिएंट आढळून आला आहे. अनियंत्रित परिस्थितीचा सामना करण्यासाठी चीन सरकारने शांघायमध्ये सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

याशिवाय 2000 हून अधिक आरोग्य कर्मचारीही स्वतंत्रपणे येथे पाठवण्यात आले आहेत. हे सर्व लोक मिळून शहरातील सुमारे 2.6 कोटी लोकांची चाचणी करणार आहेत. दरम्यान. शांघायची लोकसंख्या जवळपास 2.6 कोटी आहे.

ओमायक्रॉनच्या BA.1.1 स्ट्रेनमधून नवीन सबव्हेरिएंट विकसित झाल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. चीनमध्ये सापडलेला नवीन सबव्हेरिएंट कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा म्यूटेंट 'XE' शी संबंधित नाही. कोरोना व्हायरसच्‍या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे दोन प्रकार आहेत.

पहिला ओमायक्रॉन BA.1 आणि दुसरा BA.2 आहे. BA.1.1 हा ओमायक्रॉन म्हणजेच BA.1 चा सबटाइप आहे.

चीनमध्ये BA.1.1 च्या प्रकरणानंतर चिंता वाढली आहे. परंतू, अद्याप बरीच प्रकरणे नोंदवली गेली नाहीत आणि प्राथमिक तपासणीत असे आढळून आले आहे की नवीन व्हेरिएंट इतक्या वेगाने पसरत नाही. मात्र, असे असतानाही आरोग्य यंत्रणा त्यावर लक्ष ठेवून असून, त्यावर अभ्यास केला जात आहे.