One in every four indians may have antibodies to fight coronavirus shows private survey
खुशखबर! भारतात सर्वाधिक लोकांच्या शरीरात कोरोनाशी लढण्यासाठी एंटीबॉडी तयार By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 12:50 PM2020-08-19T12:50:05+5:302020-08-19T13:34:16+5:30Join usJoin usNext कोरोना व्हायरसनं जगभरात हाहाकार निर्माण केला आहे. दरम्यान एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. देशांच्या प्रत्येकी चारपैकी एका व्यक्तीमध्ये कोरोनाची लढत असलेल्या एंटीबॉडी विकसित झाल्या आहेत. एका नॅशनल लेव्हल प्रायव्हेट लॅबोरेटरीमध्ये कोविड १९ टेस्टच्या आधारे ही माहिती समोर आली आहे. शहरातील अनेक सिविल कॉर्पोरेशंस आणि देशांतील काही प्रमुख रिसर्च संस्थानांच्या (TIFR, IISER) सर्वेक्षणात समोर आलेल्या माहितीनुसार पुण्यातील काही भागांमधील ५० टक्क्यांहून अधिक नागरिकांच्या शरीरात एंटीबॉडी तयार झाल्याची आकडेवारी समोर आली. एक चतुर्थांश व्यक्तींच्या शरीरात कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या एंटीबॉडी तयार झाल्याचं समोर आलं आहे. याशिवाय मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या ५७ टक्के व्यक्तींच्या शरीरातही सीरो-पॉझिटिव्हिटी दिसून आली. दिल्लीतही नुकतंच सीरो सर्वेक्षण करण्यात आलं. त्यात २३ टक्के व्यक्ती सीरो-पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं. दिल्लीतल्या दुसऱ्या टप्प्यातल्या सीरो सर्वेक्षणाचा अहवाल याच आठवड्यात येणार आहे. शरीरात एंटीबॉडीज तयार होणं म्हणजेच कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढली आहे. महाराष्ट्र टास्क फोर्सचे सदस्य डॉ शशांक जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार भारत हा एकमेव असा देश आहे. ज्या देशात जास्त सीरो पॉझिटिव्हीटी दिसून आली आहे. यातून रोगप्रतिकारकशक्ती मजबूत असल्याचं दिसून येत आहे. शरीरात तयार झालेल्या एंटीबॉडी व्यक्तीचा कोरोनापासून बचाव करतात. रोगप्रतिकारशक्ती चांगली असलेल्या व्यक्तींच्या शरीरात अँटीबॉडी आढळून येतात. मात्र या अँटीबॉडीमुळे किती काळ कोरोनापासून बचाव होतो, याबद्दल अद्याप तज्ज्ञांनी आपलं मत स्पष्ट केलेलं नाही. राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी यांनी दिलेल्या माहितीनुसार मोठ्या प्रमाणात सीरो-पॉझिटिव्हिटी असलेला भारत हा जगातील एकमेव देश आहे. त्यामुळे भारतीयांची रोगप्रतिकारशक्ती खूप चांगली असल्याचं दिसून येतं. भारतभरात थायरोकेअर लॅबोरेटरीकडून अँटीबॉडी टेस्ट केल्या जात आहेत. . 'देशात आतापर्यंत २ लाख लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. यातल्या जवळपास २४ टक्के लोकांमध्ये कोरोनाचा सामना करू शकणाऱ्या अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत. दिल्लीत २९ टक्के, तर महाराष्ट्रात २७ टक्के लोकांच्या शरीरात अँटीबॉडीज असल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं. ठाण्यातील एक तृतीयांश, तर नवी मुंबईतील २१ टक्के नागरिक सीरो-पॉझिटिव्ह आहेत,' अशी आकडेवारी लॅबचे व्यवस्थापकीय संचालक अरोकियास्वामी वेलुमणी यांनी दिली.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याहेल्थ टिप्सआरोग्यcorona virusHealth TipsHealth