Paracetamol more harm than good do not prescribe for chronic pain
'या' औषधांच्या सेवनाने आरोग्यावर होत आहे नकारात्मक परिणाम; तज्ज्ञ म्हणाले की.... By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 04:34 PM2020-08-04T16:34:34+5:302020-08-04T17:03:44+5:30Join usJoin usNext Paracetamol, Ibuprofen आणि Aspirin या औषधांचा वापर क्रोनिक पेन म्हणजे रोज उद्भवणारी डोकेदुखी, थकवा येणं या समस्यांवर उपचार म्हणून केला जातो. या गोळ्यांच्या सेवनाने तात्पुरत्या स्वरुपात बरं वाटत असलं तरी आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. म्हणून ब्रिटेनच्या आरोग्य अधिकारी वर्गाने मोठं पाऊल उचललं आहे. National Institute for Health and Care Excellence (NICE) नवीन गाईडलाईन्सनुसार डॉक्टरांना क्रोनिक पेनसाठी ही औषधं रुग्णांना न देण्याचं आवाहन केलं आहे. NICE या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार लोकांच्या शारीरिक वेदना आणि मानसिक समस्या या औषधांच्या सेवनानं कमी होतात. पण आतापर्यंत याबाबत फारसे पुरावे सापडलेले नाहीत. या गोळ्या घेण्याची सवय रुग्णाला झाल्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ब्रिटनची तीन तृतीयांशपेक्षा अधिक लोकसंख्या क्रोनिक पेनने प्रभावित आहे. अशा स्थितीत अर्ध्यापेक्षा जास्त लोक डिप्रेशनचे शिकार झाले आहेत. गाईडलाईन्सनुसार मुख्यत्वेः क्रोनिक पेनचा सामना करत असलेल्या लोकांना Antidepressants दिली जात आहे. अशा गोळ्या जास्त प्रमाणात घेणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. या विषयावर अधिक रिसर्च सुरू आहे. ब्रिटनचे आरोग्य मंत्री मॅट हॅन्कॉक हे डॉक्टरांकडून दिल्या जात असलेल्या Anti-depressant गोळ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे चिंतेत आहेत.Read in Englishटॅग्स :हेल्थ टिप्सटॅबलेटडॉक्टरआरोग्यHealth TipstabletdoctorHealth