'या' वयोगटातील लोकांमार्फत वेगानं होतोय कोरोना विषाणूंचा प्रसार; WHO च्या तज्ज्ञांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 03:48 PM2020-08-18T15:48:26+5:302020-08-18T16:05:50+5:30

जीवघेण्या माहामारीत संपूर्ण जगभरात कोरोना संक्रमिताची संख्या दोन कोंटींवर पोहोचली आहे. युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोना प्रसाराचा वेग कमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पण अमेरिका, ब्राझिल आणि भारतात अजूनही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाच्या प्रसाराबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार २० ते ५० वर्ष वयोगटातील लोकांनी जीवघेणा व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरवला आहे.

पश्चिमी देशातील कोरोना संक्रमणाबाबत बोलातना WHO चे रीजनल डायरेक्टर डॉ. तकेशी कासाई यांनी सांगितले की, २०, ३०, आणि ४० या वयोगटातील लोकांमार्फत कोरोना वेगानं पसरलं आहे. यातील जास्तीत जास्त लोकांना ते कोरोना संक्रमित असल्याची कल्पनासुद्धा नाही.

डॉ. तकेशी कासाई यांनी सांगितले की, २० ते ५० या वयोगटातील लोकांकडून कोरोनाचं संक्रमण पसरलं जात आहे. दीर्घकाळ आजारी असलेले लोक, वृद्ध व्यक्ती, गर्दीची ठिकाणं आणि अंडर-रिजर्व्ड एरियामध्ये लोकांसाठी व्हायरस धोकादायक ठरू शकतो.

WHO च्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलिया, फिलिपींस आणि जपान या देशांमध्ये ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेले जास्तीत जास्त लोक संक्रमित झाले आहेत. या लोकांमध्ये व्हायरसची लक्षणं दिसून येत आहेत. तर काहींमध्ये लक्षणं नसतानाही कोरोनाचं संक्रमण झालं आहे. त्यातून नकळतपणे एकमेकांपर्यंत संक्रमण पोहोचत आहे.

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या कमी करण्यासाठी सरकारी आरोग्य व्यवस्थांमध्ये अधिक सुधारणा घडवून आणणं तसंच लोकांना वैयक्तीक स्वच्छतेबाबत अधिक सुरक्षितता बाळगणं गरजेचं आहे.

कोरोना व्हायरसला नष्ट करण्यासाठी जगभरातील देशांनी लॉकडाऊन केला होता. आता हळूहळू नियम आणि अटी घालून नियमांमध्ये शिथिलता देण्यात येत आहे.