डाळिंबाची साल फेकण्याची चूक करु नका! फायदे समजले तर फेकण्याआधी १० वेळा विचार कराल By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 07:00 AM 2022-06-14T07:00:38+5:30 2022-06-14T09:08:18+5:30
डाळिंबाची साल जर तुम्ही अशीच फेकुन देत असाल तर तुम्ही चूक करताय. डाळिंबाच्या सालीमध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे ही साल फेकुन देण्याआधी १० वेळा विचार करा. टॅनिंग - उन्हाळ्यात त्वचेवर डाळिंबाच्या सालींचा वापर केल्याने सूर्यप्रकाशाच्या हानिकारक किरणांपासून बचाव होतो. उन्हात जाण्यापूर्वी डाळिंबाच्या सालीची पावडर कोणत्याही क्रीम, लोशन किंवा इसेन्शल तेलात मिसळून लावल्याने केवळ सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण मिळत नाही तर त्वचेला टॅनिंग आणि सनबर्नपासूनही रोखता येते.
जर तुमच्या घशामध्ये सतत खवखव होत असेल तर तुम्हाला टॉन्सिलचा त्रास आहे, हे स्पष्ट होते. डाळिंबाच्या सालीच्या चहाचे सेवन केल्यामुळे घशातील खवखव दूर करण्यास मदत होते.
डाळिंबाच्या सालीची पावडर एक चमचे कोमट पाण्यात मिसळून हे मिश्रण रोज प्याल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. तथापि, रोज हे पेय प्यायल्याने आपल्याला योग्य आहार आणि नियमित व्यायामासह आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळेल.
उन्हात वाळवून डाळिंबाच्या सालांची पावडर बनवा आणि हवाबंद डब्यात साठवा. घराबाहेर पडण्याच्या 20 मिनिटे आधी ही पावडर तुमच्या लोशन किंवा क्रीम मध्ये मिसळा. वैकल्पिकरित्या जर तुम्हाला नैसर्गिक सनस्क्रीन वापरायचे असेल तर तुम्ही ही पावडर काही आवश्यक तेलांमध्ये मिसळून चेहऱ्यावर लावू शकता.
वाळलेल्या डाळिंबाच्या सालीची पूड केसांच्या तेलात मिसळा. त्यानंतर ते केसांच्या मुळांशी लावा आणि चांगली मसाज करा. तुम्ही हे तेल लावल्यानंतर दोन तासांनी सौम्य शॅम्पूने केस धुवू शकता किंवा तुमच्या सोयीनुसार रात्रभर तसेच ठेऊ शकता. अशाप्रकारे डाळिंबाच्या साली आपले संपूर्ण आरोग्य निरोगी राखण्यात मदत करतात.
वाळलेल्या डाळिंबाच्या सालीची पूड केसांच्या तेलात मिसळा. त्यानंतर ते केसांच्या मुळांशी लावा आणि चांगली मसाज करा. तुम्ही हे तेल लावल्यानंतर दोन तासांनी सौम्य शॅम्पूने केस धुवू शकता किंवा तुमच्या सोयीनुसार रात्रभर तसेच ठेऊ शकता. अशाप्रकारे डाळिंबाच्या साली आपले संपूर्ण आरोग्य निरोगी राखण्यात मदत करतात.
उघडे छिद्र बंद होतील : उन्हाळ्यात धूळ, घाण आणि घामामुळे त्वचेची छिद्रे उघडू लागतात. अशा परिस्थितीत डाळिंबाच्या सालींचा फेस पॅक त्वचेची छिद्रे कमी करण्यास मदत करतो. यासाठी डाळिंबाच्या सालीपासून बनवलेल्या पावडरमध्ये दही, गुलाबजल आणि एसेन्शियल ऑईल मिसळून पेस्ट बनवा. आता ते त्वचेवर लावा आणि कोरडं झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा.
जर तुमची लहान मुलं नीट जेवत नसतील तर डाळिंबाच्या सालीची पावडर घुटीत मिसळून तुम्ही त्यांची भूक वाढवू शकता. अनेक लोक अजूनही डाळिंबाच्या सालीच्या पावडरपासून बनवलेली घुटी वापरतात.
डाळिंबाच्या सालींमध्ये अॅन्टीऑक्सिडंट तत्व मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे डाळिंबांच्या सालींपासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. जेवल्यानंतर या चहाचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. तर पोटाच्या इतर समस्या दूर होण्यासही मदत होते.
वृद्धत्वाची लक्षणे दूर होतील: डाळिंबाची साल त्वचेतील कोलेजन कमी करून त्वचेच्या मृत पेशी दुरुस्त करण्याचं काम करते. त्यामुळे सुरकुत्या आणि बारीक रेषा यांसारखी वृद्धत्वाची लक्षणंही कमी होतात. यासाठी डाळिंबाच्या सालीपासून बनवलेल्या पावडरमध्ये 2 चमचे गुलाबपाणी घालून चेहऱ्याला लावा आणि कोरडे झाल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.