CoronaVirus News : फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण कोरोनाग्रस्तांसाठी ठरू शकतं घातक, तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 11:22 AM 2020-10-10T11:22:54+5:30 2020-10-10T12:15:20+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: दिवाळी फटाके वाजवले जातात. मात्र यंदा कोरोनाच्या संकटात फटकांमुळे होणारं प्रदूषण हे रुग्णांसाठी घातक ठरू शकतं. कोरोनाग्रस्त तसेच विविध आजारांचा सामना करणाऱ्या रुग्णांना त्याचा त्रास होऊ शकतो. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असून देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. रुग्णांचा आकडा तब्बल 69,79,424 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे देशभरात 1,07,416 लोकांना जीव गमवावा लागला आहे.
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 73,272 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 926 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या काळात अधिक काळजी घेण्याचा सल्ला हा देण्यात आला आहे.
कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून येत्या काही दिवसांत कोरोनाचा धोका कायम असल्याची माहिती आता समोर आली आहे. सध्या सण-समारंभाचे दिवस आहेत. त्यामुळे या काळात मास्क घालूनच सर्व सण साजरे करावेत असा सल्ला केंद्र सरकारने नागरिकांना दिला आहे.
नीती आयोगाचे सदस्य आणि भारताच्या कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांनी "कोरोनाचा अधिक संसर्ग होऊ नये, यासाठी पुढील काही महिन्यांत आपल्याला मास्कवाली पूजा, मास्कवाली छटपूजा, मास्कवाली दिवाळी, मास्कवाला दसरा, मास्कवाली ईद साजरी करावी लागेल" असं म्हटलं आहे.
दिवाळी फटाके वाजवले जातात. मात्र यंदा कोरोनाच्या संकटात फटकांमुळे होणारं प्रदूषण हे रुग्णांसाठी घातक ठरू शकतं. कोरोनाग्रस्त तसेच विविध आजारांचा सामना करणाऱ्या रुग्णांना त्याचा त्रास होऊ शकतो.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी विशेषज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नागरिकांना कोरोना काळात यंदा दिवाळी स्वयंशिस्त पाळून आणि फटाक्यांचा वापर न करता साजरी करण्याचं सांगितलं आहे.
फटाक्यांमुळे होणारा धूर आणि प्रदूषण हे सर्वसामान्यांसह, कोरोनाग्रस्तांना किंवा कोरोनातून मुक्त झालेल्या व्यक्तींसाठीही घातक ठरू शकतं असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
राजस्थान राज्य मानवाधिकार आयोगाने फटाक्यांच्या वापरावर बंदी घालण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. तसेच डॉक्टरांनी कोरोना काळात फटाक्यांचा वापर टाळण्याबाबत इशारा दिला आहे.
दिवाळीमध्ये फटाक्यांच्या धूरामुळे, त्यातून निर्माण झालेल्या प्रदूषणामुळे, कोरोनाग्रस्त आणि कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तींना त्रास होऊ शकतो असल्याचं म्हटलं आहे.
राजस्थामध्ये झालेल्या या बैठकीत वैद्यकीय आणि आरोग्य विभागाचे प्रधान सचिव अखिल अरोरा यांनी गेल्या काही दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्णांच्या वाढत्या संख्येत काही प्रमाणात स्थिरता आल्याची माहिती दिली.
30 सप्टेंबर रोजी ऑक्सिजन बेड, आयसीयू आणि व्हेंटिलेटरची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांची संख्या 2800 हून अधिक होती. ती 8 ऑक्टोबरपर्यंत कमी होऊन 2100 वर पोहचली असल्याचं देखील म्हटलं आहे.
ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयूची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. कोरोनाच्या काळात विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहे. तसेच अनेकांवर उपचार सुरू असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे
सण-समारंभ असल्याने लोक एकमेकांना भेटण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे अशा वेळी मास्क लावण्याचा आणि योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.