लाल त्वचा, त्वचेवरील सूज आहे 'या' गंभीर आजाराचा इशारा, अजिबात दुर्लक्ष करु नका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 11:00 AM2022-11-11T11:00:37+5:302022-11-11T11:08:20+5:30

त्वचेचे विकारही बऱ्याचदा धोकादायक असू शकतात. याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर आजारांचा सामना करावा लागेल. वेळीच लक्ष द्या.

बेरी berry हे सोरायसिसवर चांगलेच फायदेशीर आहे. यामध्ये असलेले पोषक तत्व सोरायसिसमुळे आलेली सुज कमी करते. सोरायसिसवर नियंत्रण मिळवण्यासाठी व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो.

अकरोड walnut मध्ये ओमेगा ३ चा समावेश आहे. यामुळे सोरायसिस लवकर बरा होतो. यात असलेले ऍंटिऑक्सिडेंट्स त्वचेसाठी उपयोगी आहेत.

सोरायसिस असलेल्यांनी कांदा खाण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये ऍंटिबायोटिक असतात जे रोगप्रतिकारकशक्ती वाढवतात. सोरायसिस पसरण्यापासून थांबवतात.

Turmeric हळदीसारखे नैसर्गिक उपचार करणारे औषध शरीरीसाठी कधीही फायदेशीरच आहे. हळदीमुळे अनेक त्वचेचे विकार नाहीसे होतात. सोरायसिस मध्येही हळद खाणे किंवा त्याचा पॅक त्वचेवर लावणे फायदेशीर आहे.

ऑलिव्ह ऑईलमध्ये असणारे पोषक त्तव सोरायसिस वर उत्तम उपाय आहे. इतर तेलांमुळे त्वचेचे विकार वाढू शकतात. म्हणून आहारात ऑलिव्ह ऑईल असावे.