हाय कोलेस्ट्रॉल, हार्ट अ‍ॅटॅकचं टेन्शन सोडा, या 5 गोष्टी आहारात सुरू करा; मग बघा कमाल...!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 07:44 PM2024-07-06T19:44:17+5:302024-07-06T20:02:43+5:30

निसर्गात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्तवाहिन्या साफ करण्यास मदत करू शकतात...

सध्याचे धावपळीचे जीवन आणि खाण-पाणाच्या चुकीच्या सवयी, यांमुळे हाय कोलेस्ट्रॉल ही एक सर्वसामान्य समस्या बनली आहे. कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊन हृदयविकार, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक सारखे गंभीर आजार होऊ शकतात. मात्र घाबरण्याचे कारण नाही. कारण, निसर्गात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्तवाहिन्या साफ करण्यास मदत करू शकतात. तर जाणून घेऊयात अशाच 5 खास गोष्टींसंदर्भात, ज्यांचा आपण आपल्या आहारात समावेश करू शकतो.

ओट्स - ओट्स हा विरघळणाऱ्या फायबरचा एक चांगला स्त्रोत आहे. जो 'बॅड' कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास आणि 'गुड' कोलेस्ट्रॉल (HDL) वाढविण्यास मदत करते.

नट्स आणि बिया - बदाम, अक्रोड, पिस्ता, चिया बिया आणि जवस यांसारख्या नट्स आणि बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

हिरव्या भाजा - पालक, मेथी, कोथिंबीर आणि कारले यांसारख्या हिरव्या भाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात.

फळं - फळांचा विचार करता, सफरचंद, संत्री, द्राक्षे आणि डाळिंब आदी काही फळेही कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.

लसून - लसणामध्ये ॲलिसिन नावाचे एक संयुग असते जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्त पातळ करण्यास मदत करते.

(टीप - प्रिय वाचक, ही माहिती केवळ घरगुती उपचार, उपाय आणि सर्वसामान्य माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. आपण प्रकृतीशी संबंधित कुठलीही गोष्ट आमलात आणण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यायला हवा.)