Remember to keep these 4 things during the fast
उपवासादरम्यान या ४ गोष्टी ठेवा लक्षात By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 07:29 PM2017-12-21T19:29:43+5:302017-12-21T19:39:50+5:30Join usJoin usNext भारतीय परंपरेत उपवासाची संस्कृती फार पुर्वीपासून आहे. आठवड्यातून एकदा, काही सण-वारांमध्ये किंवा काही ठराविक दिवशी उपवास करण्याची पध्दत आहे. काही लोकं धार्मिक कारणास्तव तर काही लोकं पोटाला आराम म्हणून उपवास धरतात. काही गोष्टी लक्षात घेऊन उपवास केल्यास शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होत नाही. उपवासादरम्यान हलका किंवा फलाहार घ्यावा जेणेकरून पचनसंस्थेवरील ताण कमी होतो आणि पचनव्यवस्था सुरळीत राहते, पचनकार्याला चालना मिळते. यावेळी शरीरांतर्गत कमी प्रक्रिया चालु असल्याने मनही शांत असतं. त्यामुळे अनेक समस्यांवर नियंत्रण मिळवणं शक्य होतं. शरीर आणि मनातील ऊर्जा वाढते. उपवासादरम्यान तेलकट आणि जड पदार्थ खाणं टाळा. राजगिरा, फळं, दुध, थालिपीठ असा हलका आहार घ्यावा, जेणेकरून पचनावर भार येणार नाही. तसंच यादरम्यान भरपुर पाणी प्यावे आणि लस्सी किंवा ताकसारखी पेय पित राहावे. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे शरीरात कुठेतरी निरुपयोगी किंवा विषारी घटक साठून राहिलेले असतात. त्यातून शरीराला अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोटाला आराम मिळावा आणि शरीरातील निरुपयोगी घटक बाहेर पडावेत म्हणून एक दिवस पोटाला आराम देणं आवश्यक असतं.टॅग्स :आरोग्यअन्नHealthfood