CoronaVirus News: मिठाच्या गरम पाण्याची गुळणी कोरोना रोखणार?; वैज्ञानिकांचं संशोधन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 02:48 PM2020-06-25T14:48:28+5:302020-06-25T15:05:50+5:30

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील शास्त्रज्ञ कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी संशोधन करत आहेत. एकीकडे, कोरोनाच्या लसीबद्दल सकारात्मक परिणाम येत आहेत. दुसरीकडे बरेच कंपन्या त्यांचे औषध तयार करण्यात गुंतलेल्या आहेत.

भारतात सर्दा किंवा ताप आल्यानंतर घरगुती उपचार म्हणून गरम मीठाच्या पाण्याने गुळणी केली जाते. मीठाच्या पाण्याने गुळणी केल्यामुळे सर्दी, खोकला कमी होतो असं सांगणयात येतं. मात्र आता कोरोनाबाधित रुग्णाला हा घरगुती उपायाचा फायदा होऊ शकतो की नाही याबाबत स्कॉटलंडमधील एडिनबर्ग यूनिवर्सिटीने संशोधन करण्यास सुरुवात केले आहे.

मीठ टाकून गरम पाण्याच्या गुळण्या केल्यास खोकला, सर्दी कमी होते, असं अनेक डॉक्टरांकडून सांगणयात येते.

आता स्कॉटलंड (स्कॉटलंड) मध्ये एडिनबर्ग युनिवर्सिटी (एडिनबर्ग युनिव्हर्सिटी) चे वैज्ञानिक गरम पाण्याची गुळणी केल्याने कोरोनाच्या रुग्णांना फायदा होऊ शकतो का याचे संशोधन करणार आहे.

एडिनबर्ग युनिवर्सिटीचे वैज्ञानिक गरम पाण्याने गुळण्या केल्यास शरीरात काही बदल होतो का यासंदर्भात निरिक्षण करणार आहे.

या चाचणीसाठी काही कोरोनाबाधित रुग्णांची निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या रुग्णांना गरम पाणी देऊन काही फरक पडतो का याचा शोध घेण्यात येणार आहे.

गरम पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्यास कोरोनाचा धोका कमी होत असल्याचे सिद्ध झाल्यास कमी खर्चात उपचार होण्यास मदत होईल.

एडिनबर्ग विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने कोरोना विषाणूंविरूद्ध लढण्याची शारिरीक क्षमता वाढते.