लैंगिक संबंधातून मंकीपॉक्स संक्रमित होण्याचा धोका?; रिपोर्टमधून मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 04:01 PM2024-08-21T16:01:26+5:302024-08-21T16:10:26+5:30

वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशननं मंकीपॉक्स आजारावरून जागतिक इमर्जेन्सी घोषित केली आहे. त्यानंतर लैंगिक संबंधातून मंकीपॉक्स वेगाने पसरतो का याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

मंकीपॉक्स व्हायरसबाबत डॉ. अतुल गोयल यांनी सांगितले की, मंकीपॉक्स त्वचा आणि त्वचेशी संपर्कात येणे, लैंगिक संबंध यातूनही वेगाने पसरतोय असं सांगितले. मात्र यातून घाबरण्याचं कारण नसल्याचं त्यांनी सांगितले.

मागील २०२२-२३ काळात ३० रुग्ण आढळले होते. ज्यातील १२ परदेशातून आले होते. इतरही परदेशातील होते जे भारतात राहत होते. मंकीपॉक्स आजाराशी लढण्यासाठी आम्ही तयारी केली आहे असं डॉ. अतुल गोयल यांनी सांगितले. गोयल हे राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे संचालक आहेत.

मंकीपॉक्स संक्रमित व्यक्तीचे चुंबण घेणे, त्याला स्पर्श करणे आणि लैंगिक संबंध ठेवणे यामुळेही पसरतो. WHO नुसार, रॅशेज, शरीरातील पस, रक्त याच्या इन्फेशनमुळे हा रोग पसरतो. हा व्हायरस थुकीच्या माध्यमातूनही पसरतो.

जर संक्रमित व्यक्तीचे कपडे, अंथरूण आणि भांडी याचा वापर केला तरी मंकीपॉक्स पसरू शकतो. संक्रमित व्यक्तीसोबत लैंगिक संबंध बनवल्यास हा आजार दुसऱ्या व्यक्तीला संक्रमित होऊ शकतो. परंतु लक्षण न दिसणारे लोक हा आजार पसरवू शकतो की नाही याबाबत स्पष्टता नाही.

सर गंगाराम हॉस्पिटलमधील सीनिअर कंसल्टेंट डॉ. धीरेन गुप्ता म्हणाले की, जर मंकीपॉक्स रुग्ण पार्टनरसोबत लैंगिक संबंधात आला तर त्यातून हा व्हायरस पसरू शकतो. मंकीपॉक्सची लक्षणे आढळली तर त्याच्यापासून अंतर ठेवायला हवं.

मंकीपॉक्स व्हायरल हा वेगाने संक्रमित होत असून या रुग्णाच्या कपडे, अंथरूण, भांडी आणि त्याला हात लावल्यावरही पसरू शकतो. ताप, डोकेदुखी, पुरळ, स्नायू दुखणे, त्वचेवर पुरळ उठणे, फोड येणे, खाज येणे, त्वचेवर जखमा आणि शरीरात अनेक ठिकाणी गुठळ्या तयार होणे अशी मंकीपॉक्सची लक्षणे आहेत.

जगात मंकीपॉक्सचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. भारतासाठी ही चिंतेची बाब आहे कारण शेजारील देश पाकिस्ताननंतर आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) मंकीपॉक्सचे प्रकरण समोर आले आहे. अशा प्रकारे, पाकिस्तान आणि पीओकेमध्ये या आजाराच्या एकूण चार केस आढळून आल्या आहेत.

वाढत्या धोक्यामुळे केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सर्व राज्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व विमानतळांच्या तसेच बांगलादेश आणि पाकिस्तानच्या सीमेजवळील अधिकाऱ्यांना 'मंकीपॉक्स'मुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांबाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे.

मंकीपॉक्स आजारावरून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहून मुंबई विमानतळावर कठोर तपासणी आणि क्वारंटाईन नियम लागू करण्याची मागणी केली होती. भारतात सध्या मंकीपॉक्स संक्रमण आढळलं नाही. मात्र केंद्र आणि राज्य सरकारकडून खबरदारी घेण्यात येत आहे.