The risk of TB due to corona?
कोरोनामुळे ‘टीबी’चा धोका? By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 01:50 PM2021-08-24T13:50:02+5:302021-08-24T14:06:56+5:30Join usJoin usNext corona : कर्नाटकात क्षयरोगाचे २४ रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कोरोनातून बरे झालेल्यांना अनेक व्याधींना सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यातच आता क्षयरोगाची (टीबी) भर पडली आहे. देशभरातही अशा प्रकारचे रुग्ण निदर्शनास येण्याची शक्यता आहे. कर्नाटकात क्षयरोगाचे २४ रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तेथील सरकारने आता दारोदारी जाऊन २८ लाख लोकांचे सर्वेक्षण करत टीबी चाचण्या करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. सरकारकडून प्रयत्न टीबीला रोखण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. टीबी डायग्नोस्टिक लॅब्सही केंद्राकडून सुरू करण्यात आल्या. तसेच घरोघरी टीबीप्रतिबंधक औषधांचे वाटप करण्यात आले. आताही कोरोनाग्रस्तांना टीबी होऊ नये याची खबरदारी घेण्याचा सल्ला केंद्राने सर्व राज्यांना दिला असून त्यानुसार अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. कोरोना व टीबीचा काय संबंध? कोरोनामुळे प्रतिकारशक्ती कमी होते आणि त्यामुळे टीबी होण्याचा धोका वाढतो. कोरोनावरील उपचारांदरम्यान स्टेरॉइड्स आणि इतर काही प्रबळ औषधांचा वापर करण्यात आला. त्यामुळे संबंधितांच्या रोग प्रतिकारशक्तीवर दीर्घकाळपर्यंत परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये टीबीची लक्षणे आढळून येण्याची शक्यता वाढली आहे. हे लक्षात असू द्या कोरोना आणि टीबी हे दोन्ही आजार फुफ्फुसांशी संबंधित आहे. त्यामुळेही कोरोनानंतर टीबी होण्याचा धोका आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतरही श्वसनाशी संबंधित त्रास तसेच खोकला कायम राहतो. लाँग कोव्हिड आणि टीबी यांची लक्षणे एकसमान आहेत. टीबीवरील औषधे वेळच्यावेळी न घेतल्यास त्यांचा परिणाम होणार नाही. गंभीर स्वरूपाचा कोरोना ज्यांना होऊन गेला आहे त्यांच्यात टीबी होण्याचा सर्वाधिक धोका असतो.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याआरोग्यcorona virusHealth