Corona Vaccine : कोरोना लस घेतल्यानंतर सेक्सपासून 3 दिवस राहा दूर, डॉक्टरांचा सल्ला...!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 01:54 PM2021-07-12T13:54:48+5:302021-07-12T14:10:44+5:30

रशियामध्ये लोकांना लस घेतल्यानंतर किमान तीन दिवस सेक्सपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. (corona vaccine)

सध्या संपूर्ण जगात लसीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यातच काही तज्ज्ञमंडळी लस घेण्यापूर्वी आणि नंतर अनेक गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, रशियामध्ये लोकांना लस घेतल्यानंतर किमान तीन दिवस सेक्सपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. (Russia doctor say Stay away from sex for 3 days after getting corona vaccine)

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, सेराटोव भागातील उप-आरोग्यमंत्री डॉक्टर डेनिस ग्रेफर यांनी रशितील लोकांना लस घेतल्यानंतर कुठल्याही प्रकारचे अधिक मेहनतीचे काम करू नका, असा सल्ला दिला आहे. यांत सेक्सचाही समावेश आहे. यापूर्वी येथील लोकांना लस घेतल्यानंतर दारू आणि सिगारेटपासूनही दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला होता.

रशिया हा जगातील ज्या देशांचा लसीकर दर अत्यंत कमी आहे, अशा देशांपैकी एक आहे. येथे आतापर्यंत केवळ 13 टक्के लोकांनाच लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

एका पत्रकार परिषदेत डॉक्टर ग्रेफर म्हणाले, 'सेक्ससाठी प्रचंड एनर्जी लागते हे सर्वांनाच माहीत आहे. यामुळेच आम्ही, लोकांना लस घेतल्यानंतर सेक्स सारख्या फिजिकल अॅक्टिव्हिटीपासून दूर राहण्याचा सल्ला देत आहोत.'

खरे तर, ग्रॅफर यांच्या विधानावरून तेथील माध्यमांमध्ये त्यांच्यावर टीकाही होत आहे. तेथील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी ओलेग कोस्टिन यांनी सांगितले, की ते ग्रॅफर यांच्या विधानाशी सहमत नाहीत. कोस्टिन यांनी म्हटले आहे, की लस घेतल्यानंतर, सेक्स पूर्णपणे थांबविण्याऐवजी आपण काळजीपूर्वक करू शकता. फक्त तो आवश्यकतेपेक्षा अधिक नसावा.

भारतात लसीकरणानंतर, अशा प्रकारची कोणतीही अधिकृत गाईडलाईन जारी करण्यात आलेली नाही. तथापि, युनिसेफकडून लस घेतल्यानंतर काही खास गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. युनिसेफचेही म्हणणे आहे, की लस घेतल्यानंतर 2-3 दिवस कोणत्याही प्रकारची फिजिकल अॅक्टिव्हिटी टाळायला हवी. कारण या काळात शरीर लसीच्या दुष्परिणामांपासून रिकव्हर होत असते.

लसीकरणानंतर काही दवस अल्कोहल आणि तंबाकूचे सेवन करू नये, असा सल्लाही यूनिसेफने दिला आहे. दारू आणि सिगारेट लशीचे साइड इफेक्ट्स आणखी वाढवू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याशिवाय दारू इम्यून सिस्टमवरही वाईट परिणाम करते. ज्यामुळे लशीचा प्रभाव शरिरावर कमी होतो.

लस घेण्यापूर्वी आणि नंतर हायड्रेटेड राहणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे लस घेतल्यानंतर भरपूर पाणी प्यायला हवे. लस घेतल्यानंतर हात दुखणे, ताप आणि थंडी वाजणे ही सामान्य लक्षणे आहेत. ते दोन दिवसांत आपोआप बरे होतात. लशीचे दोन डोस घेतल्यानंतर काही आठवड्यांत शरिरात इम्यूनिटी तयार होते. यामुळे या दिवसांत कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नका.

कोणतीही लस शंभर टक्के प्रभावी नाही. यामुळे लस घेतल्यानंतरही, आपल्याला वारंवार, हात धुणे, मास्कचा वापर करणे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे आवश्यक आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या पद्धतीने कोरोनाचे नव-नवे व्हेरिएंट येत आहेत, त्यांच्यापासून केवळ लसच आपल्याला सुरक्षित ठेवू शकते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत लस अवश्य घ्यायला हवी.