काय सांगता काय? या पुढे आईशिवाय बाळ जन्माला येणं शक्य! शास्त्रज्ञांनी केलं नवं संशोधन By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 06:46 PM 2022-02-17T18:46:12+5:30 2022-02-17T19:42:33+5:30
विज्ञानाच्या प्रगतीने असंख्य अशक्य गोष्टी शक्य केल्या आहेत. यात आता आणखी एकाची भर पडणार आहे. शास्त्रज्ञांनी एक असे तंत्र विकसित केले आहे, ज्यामध्ये मुले आईशिवाय जन्माला येऊ शकतात. आईशिवाय मुलाचा जन्म भविष्यात एक वास्तविकता बनू शकते, असे शास्त्रज्ञ मानतात. आई-वडिलांपैकी फक्त एकाच्या जनुकांपासून भ्रूण तयार करण्यावर आयव्ही लीग अमेरिकन युनिव्हर्सिटी, हार्वर्ड आणि ब्राउन यांनी संशोधन केले आहे.
शास्त्रज्ञांनी आईशिवाय बाळाचा जन्म म्हणजे embryo farming ला in-vitro gametogenesis (IVG) म्हटले आहे. हे तंत्र डिझायनर बेबी बनवण्याच्या तंत्रातही उपयुक्त ठरू शकते.
शास्त्रज्ञांनी आईशिवाय बाळाचा जन्म म्हणजे embryo farming ला in-vitro gametogenesis (IVG) म्हटले आहे. हे तंत्र डिझायनर बेबी बनवण्याच्या तंत्रातही उपयुक्त ठरू शकते.
2016 मध्ये बाथ विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी एक तंत्र विकसित केले ज्यामध्ये मादी उंदीरशिवाय उंदीर जन्माला येऊ शकत होता.
या तंत्रात नियोजित प्रमाणे अंड्याला फर्टिलाइजेशन शिवाय भ्रूण म्हणून विकसित करण्यात आले होते. यात शुक्राणू इंजेक्ट केल्यानंतर हे शक्य झाले. त्यानंतर आईशिवाय उंदराचा जन्म होऊ शकत होता. त्याचा विकास दर 24 टक्के होता.
उंदरावरील यशस्वी प्रयोगामुळे आईशिवाय मुलाचा जन्म होऊ शकतो, असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे.
उंदरावरील यशस्वी प्रयोगामुळे आईशिवाय मुलाचा जन्म होऊ शकतो, असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे.
ब्राउन युनिव्हर्सिटीतील मेडिसिन आणि बायोलॉजिकल सायन्सचे माजी डीन डॉ. अडशी यांनी अहवालात लिहिले आहे की, IVG तंत्रज्ञान इन विट्रो फर्टिलायझेशन तंत्रातही क्रांती घडवू शकते.
येत्या काळात आयव्हीजी तंत्रज्ञानाने भ्रूण तयार केले जाण्याची शक्यता आहे. पण सध्या याची कल्पनाही करता येत नाही.
शास्त्रज्ञांनी असेही सांगितले की IVG तंत्रज्ञानाची अंमलबजावणी त्याच्या खर्चावर देखील अवलंबून असेल.
जर हे तंत्र प्रजनन अवयवांशिवाय शुक्राणू आणि अंडी तयार करू लागले, तर ते प्रजनन समस्यांशी झुंजत असलेल्या लोकांसाठी उपयुक्त ठरेल.
अभ्यासात असेही म्हटले आहे की पालकांपैकी एकाचे जनुक असलेले मूल तयार करणे त्याच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक असू शकते.