सावधान! आरोग्यविषयक ‘या’ समस्या असलेल्या लोकांसाठी चहाचा एक घोट ठरू शकतो ‘विष’ By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 03:22 PM 2024-05-21T15:22:44+5:30 2024-05-21T15:31:15+5:30
International Tea Day:चहामध्ये दूध मिसळलं की तो टॉक्सिक होतो. विशेषत: ज्यांना आरोग्याशी काही समस्यांचा सामना करावा लागतो, त्यांच्यासाठी दुधाच्या चहाचा एक घोट विषासारखा आहे. या समस्यांबाबत अधिक माहिती जाणून घेऊया... वाफाळलेल्या चहासोबत अनेकांची सकाळ होते. तर काहींना दिवसांतून खूप वेळा चहा पिण्याची सवय असते. दरवर्षी 21 मे हा दिवस इंटरनॅशनल टी डे (International Tea Day) म्हणून साजरा केला जातो.
आजकाल चहाचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. ब्लॅक टी, ग्रीन टी, लेमन टी, मसाला चहा असे विविध प्रकार आहेत. अनेकांना दुधाचा चहा हा सर्वाधिक आवडतो. पण चहाचे जसे फायदे आहेत तसे काही तोटे देखील आहेत.
चहामध्ये दूध मिसळलं की तो टॉक्सिक होतो. विशेषत: ज्यांना आरोग्याशी काही समस्यांचा सामना करावा लागतो, त्यांच्यासाठी दुधाच्या चहाचा एक घोट विषासारखा आहे. या समस्यांबाबत अधिक माहिती जाणून घेऊया...
लोह कमतरता जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर दुधाच्या चहाचे सेवन फार कमी करा किंवा अजिबात करू नका. एनसीबीआयच्या मते, चहामध्ये टॅनिन नावाचं संयुग असतं जे शरीराला लोह शोषून घेण्यापासून रोखतं.
डिप्रेशन किंवा स्ट्रेस चहा प्यायल्याने ताजेतवानं वाटतं. पण तुम्ही डिप्रेशन किंवा स्ट्रेसमधून जात असाल तर चहाचं सेवन करू नका. चहा प्यायल्याने त्याची लक्षणं अधिक तीव्र होऊ शकतात.
रात्री झोप न येणं जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर त्यामागचं सर्वात मोठं कारण चहा असू शकतं. NIH मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, कॅफिन मेलाटोनिनचे उत्पादन थांबवते, ज्यामुळे झोपेची गुणवत्ता खराब होते.
अपचन दुधाचा चहा घेतल्याने अपचन होऊ शकतं. त्यात असलेले कॅफिन आणि फॅट मिळून गॅस, ब्लोटिंग आणि ॲसिड रिफ्लक्स होतात.
हृदयरोग जर तुम्हाला हृदयासंबंधित आजार असेल तर दुधाचा चहा घेऊ नका. हा आजार वाढू शकतो. कमी प्रमाणात साखर असलेला आणि दूध नसलेला चहा पिणे हृदयासाठी फायदेशीर आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.