Health tips: टॉमेटोचे फायदे माहित असतील आता दुष्परिणामही जाणून घ्या...आहेत अत्यंत घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2022 10:58 AM2022-07-08T10:58:31+5:302022-07-08T13:37:53+5:30

टोमॅटो खाल्ल्याने व्हिटॅमिन सी सारख्या महत्त्वाच्या जीवनसत्त्वांचा पुरवठा होत असला तरी जास्त खाण्याचे काही दुष्परिणामही होतात.

टोमॅटो खाण्याचे फायदे आपल्याला माहीत असतील, आज आपण साईड इफेक्टबाबत जाणून (Side effects of Eating Tomatoes) घेऊया.

टोमॅटोचे जास्त सेवन केल्यास पोटाशी संबंधित अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते. जाणून घेऊया टोमॅटोचे जास्त सेवन केल्याने कोणते नुकसान होऊ शकतात.

अ‍ॅसिड रिफ्लेक्सची समस्या भेडसावू शकते, कारण टोमॅटोमध्ये मास्टर अ‍ॅसिड आणि सायट्रिक अ‍ॅसिड असल्यामुळे ते खूप अम्लीय बनते. याचे जास्त सेवन केल्याने छातीत जळजळ होण्याची लक्षणे दिसू शकतात.

जास्त टोमॅटो खाणे देखील आपल्या किडनीसाठी सुरक्षित नाही. त्यामुळे किडनी स्टोन होऊ शकतो.

टोमॅटोचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने सांधेदुखी आणि सांध्यांना सूज येऊ शकते. संधिवाताच्या रुग्णांसाठी याचा खूप त्रास होऊ शकतो.

जर तुम्ही जास्त संवेदनशील असाल तर टोमॅटो खाण्याने अतिसार देखील होऊ शकतो.

पचनाशी संबंधित काही इतर लक्षणे देखील दिसू शकतात, जसे की पोट खराब होणे, अस्वस्थ वाटणे इ.

टोमॅटोच्या बिया पोटात विरघळत नाहीत. जरी केचपमधील बिया काढून टाकलेल्या असल्या तरी त्यामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण वाढू शकते. केचप खूप खाण्यामुळे तुमच्या शरीरात कॅल्शिअमचे प्रमाण वाढते. मूत्राशयातून याचा योग्य निचरा न झाल्यामुळे त्याचा ताण तुमच्या किडनीवर येतो. सहाजिकच टोमॅटो आणि केचप अती प्रमाणात खाणाऱ्या लोकांना किडनीच्या समस्या जाणवतात.