Signs Of Prediabetes: डायबिटीस होण्यापूर्वी शरीर देतं हे ५ संकेत, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 06:42 PM2024-07-19T18:42:20+5:302024-07-19T18:47:03+5:30

Signs Of Prediabetes: डायबिटीस म्हणजेच मधुमेह हा एक गंभीर आजार आहे. तसेच जगभरातील कोट्यवधी लोक त्याच्याशी झुंजत आहेत. रक्तामधील साखर वाढल्याने मधुमेह होतो. जर वेळीच त्यावर नियंत्रण मिळवलं नाही तर त्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक, किडनीचे आजार, अंधत्व आदी अनेक आजार होऊ शकतात. मात्र हे टाळता येऊ शकतं.

डायबिटीस म्हणजेच मधुमेह हा एक गंभीर आजार आहे. तसेच जगभरातील कोट्यवधी लोक त्याच्याशी झुंजत आहेत. रक्तामधील साखर वाढल्याने मधुमेह होतो. जर वेळीच त्यावर नियंत्रण मिळवलं नाही तर त्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक, किडनीचे आजार, अंधत्व आदी अनेक आजार होऊ शकतात. मात्र हे टाळता येऊ शकतं. काही प्राथमिक लक्षणांकडे, संकेतांकडे लक्ष दिलं गेलं, तर मधुमेहावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. जर तुम्हाला तुमच्यामध्ये मधुमेहाची कुढलीही लक्षणं दिसून आली तर त्वरित डॉक्टरांची भेट घ्या. तसेच रक्ताची चाचणी करून घ्या.

जर तुम्हाला आधीपेक्षा अधिक वेळा लघुशंका होत असेल. विशेषकरून रात्री असं होत असेल तर तुमचं शरीर अतिरिक्त ग्लुकोज शरीराबाहेर टाकण्याचा प्रयत्न करत आहे, हा त्याचा एक संकेत असू शकतो.

जर तुम्हाला सातत्याने तहान लागत असेल, तुम्ही भरपूर पाणी प्राशन करत असाल, तर तुमच्या रक्तामधील साखर वाढली असल्याचा तो एक संकेत असू शकतो.

जर तुम्हाला सातत्याने भूक लागत असेल, खाल्ल्यानंतरही वारंवार भूक लागल्यासारखं वाटत असेल तर तुमच्या शरीराला पुरेसा ग्लुकोज मिळत नसल्याचे ते संकेत असू शकतात.

जर तुम्हाला कुठल्याही कारणाविना थकल्यासारखं वाटत असेल, तर तुमचं शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी ग्लुकोजचा पुरेसा वापर करत नसल्याचे ते संकेत असू शकतात.

जर तुमची नजर अंधूक झाली असेल किंवा तसं वाटत असेल, तर तोसुद्धा तुमच्या रक्तामधील साखर वाढल्याचं लक्षण असेल.