झोपेतून उठताच 'ही' समस्या जाणवत असेल तर वेळीच व्हा सावध, असू शकतो डायबिटीसचा इशारा....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 11:13 AM2021-01-14T11:13:51+5:302021-01-14T11:18:49+5:30

शरीरात काही फार छोटे बदल टाइप-२ डायबिटीसचे धोक्याचे संकेत देतात. सकाळी झोपेतून उठल्यावर तुम्हाला याची काही लक्षणे दिसू शकतात.

टाइप-२ डायबिटीस हा फार घातक आजार आहे. सामान्यपणे याची लक्षणे तोपर्यंत दिसत नाहीत जोपर्यंत ब्लड सतत हाय लेव्हलवर नसतं. ही बाब फार चिंताजनक आहे. कारण हाय ब्लड शुगरची लेव्हल सतत वाढल्याने हार्ट डिजीजचा धोका वाढू शकतो. पण शरीरात काही फार छोटे बदल टाइप-२ डायबिटीसचे धोक्याचे संकेत देतात. सकाळी झोपेतून उठल्यावर तुम्हाला याची काही लक्षणे दिसू शकतात.

डायबिटीस, लिपिड डिसऑर्डर आणि एंडोक्रिनॉलॉजीमधील डॉ. राल्फ अब्राहम यांनी Express.co.uk सोबत बोलताना डायबिटीसच्या काही खास लक्षणांबाबत सांगितलं आहे. डॉ. अब्राहम यांच्यानुसार, तोंड कोरडं पडणं याचं मुख्य लक्षण आहे. जर तुम्ही रात्र पुन्हा-पुन्हा लघवीसाठी उठत असाल किंवा फार जास्त तहान लागत असेल तर तुम्हाला काहीतर गडबड असल्याचं जाणवेल'.

ते म्हणाले की, तहान आणि डायबिटीसमध्ये लघवीत फार जास्त ग्लूकोज वाढण्यामुळे होतं. डॉ. अब्राहम यांनी इशारा देत सांगितले की, जर सकाळच्या वेळी तुमचं तोंड आणि घसा कोरडा होत असेल तुम्ही अलर्ट होण्याची गरज आहे. हे टाइप-२ डायबिटीसचे संकेत असू शकतात.

डॉ. अब्राहम यांच्यानुसार, टाइप-२ डायबिटीसचे आणखीही काही छोटी छोटी लक्षणे आहेत. ज्यामुळे या आजाराला 'सायलेंट किलर' म्हटलं जातं. यात थकवा, जांभई येणे, धुसर दिसणे, शारीरिक संबंधाची निगडीत समस्या, छोट्या जखमा उशीरा भरणे, फंगल इन्फेक्शन आणि शरीरावर पुरळ येणे यांसारख्या लक्षणांचा समावेश आहे.

नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार, जर तुम्हाला टाइप-२ डायबिटीसची लक्षणे दिसत असतील आणि तुम्ही यामुळे चिंतेत असाल तर वेळीच डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. डॉक्टर यावर तुम्हाला योग्य तो सल्ला देतील. यासाठी एका ब्लड टेस्ट रिपोर्टची गरज असते.

आजाराची माहिती मिळवल्यानंतर तुम्हाला ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी लाइफस्टाईलमध्ये बदल करण्याचा सल्ला दिला जातो. ब्लड शुगर मॅनेजमेंटमध्ये डाएटची खास भूमिका असते. तुम्हाला कार्बोहायड्रेटच्या सेवनावर कंट्रोल ठेवावा लागेल. याने ब्लड शुगर लेव्हल वाढते.

कार्बोहायड्रेट शरीरात लवकर विरघळतात त्यामुळे याने ब्लड शुगर लेव्हल वेगाने वाढते. यासाठी कॉम्प्लॅक्स कार्ब्स एक चांगला आणि सुरक्षित पर्याय आहे. याने ब्लड शुगर लेव्हल फार जास्त वाढत नाही.