सावधान! जास्त टोमॅटो खाल्ल्याने वाढते सांधेदुखी, चालणं होतं अवघड; 'या' समस्यांचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 01:15 PM2024-10-03T13:15:40+5:302024-10-03T13:28:14+5:30

जास्त टोमॅटो खाण्याचे तोटे काय आहेत हे जाणून घेऊया...

टोमॅटो ही एक अशी भाजी आहे जी अनेक खाद्यपदार्थांची चव वाढवतं. टोमॅटोचं महत्त्व आता इतकं वाढलं आहे की, जेव्हा ते महाग झाले तेव्हा लोकांच्या पदार्थांची चव बिघडू शकते. काही लोकांना तो नुसताही खायला आवडतो.

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, फॉस्फरस, कॅल्शियम आणि पोटॅशियमसारखे महत्त्वाचे पोषक घटक आहेत जे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. भारतातील लोकप्रिय न्यूट्रीशनिस्ट निखिल वत्स यांनी झी न्यूजला याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

कोणत्याही आरोग्यदायी गोष्टीचे फायदे आणि तोटे दोन्ही असू शकतात, त्यामुळेच एका मर्यादेपेक्षा जास्त पौष्टिक अन्नही न खाण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात.

टोमॅटोचा गुणधर्म एसिडिक असतो आणि त्यात सोलेनाईन आणि लायकोपीन देखील असतं, ज्याचं प्रमाण वाढल्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. जास्त टोमॅटो खाण्याचे तोटे काय आहेत हे जाणून घेऊया...

टोमॅटोच्या अतिसेवनाने सांधेदुखी होऊ शकते, कारण यामध्ये सोलेनाईन नावाचा अल्कलॉइड असतो, ज्यामुळे सांध्यामध्ये वेदना आणि सूज येऊ शकते. त्यामुळे सांधेदुखीसारख्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांनी टोमॅटो कमी प्रमाणात खावे.

टोमॅटो ही पचनासाठी उत्कृष्ट भाजी मानली जाते, परंतु जर तुम्ही ते एका मर्यादेपेक्षा जास्त खाल्लेत तर तुम्हाला ॲसिडिटी किंवा ॲसिड रिफ्लक्सचा त्रास होऊ शकतो.

टोमॅटोचं स्वरूप एसिडिक आहे ज्यामुळे गॅस्ट्रोइसोफेजल रिफ्लक्सची (Gastroesophageal Reflux) समस्या वाढू शकते.

जे लोक किडनीशी संबंधित आजारांनी त्रस्त आहेत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच टोमॅटो खावेत कारण तो पोटॅशियमचा रिच सोर्स मानला जातो, ज्यामुळे अनेक समस्या वाढू शकतात. अशा लोकांनी टोमॅटो सूप आणि टोमॅटो सॉस खाणं टाळलं पाहिजे.