आतड्या साफ नसतील तर होतील अनेक आजार, आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितल्या सफाईच्या खास टिप्स By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 12:57 PM 2024-03-27T12:57:42+5:30 2024-03-27T13:22:59+5:30
Colon cleansing home remedy : आज आम्ही तुम्हाला आतड्यांची सफाई कशी करावी याचे काही घरगुती आणि सोपे उपाय सांगणार आहोत. कारण असं म्हणतात की, कोणत्याही आजाराचं मूळ हे पोट असतं. Colon cleansing home remedy : पचनक्रिया चांगली ठेवणं आपल्या आरोग्यासाठी फार महत्वाचं आहे. पचन तंत्रात एक महत्वपूर्ण अवयव असतो तो म्हणजे कोलन ज्याला मोठी आतडी म्हटलं जातं. याची सफाई करणं फार महत्वाचं मानलं जातं. आज आम्ही तुम्हाला आतड्यांची सफाई कशी करावी याचे काही घरगुती आणि सोपे उपाय सांगणार आहोत. कारण असं म्हणतात की, कोणत्याही आजाराचं मूळ हे पोट असतं.
आतड्या खराब होण्याची कारणे - मिठाच्या अधिक सेवनामुळे आतड्यांना सूज येऊ शकते, असं अमेरिकेतील अभ्यासकांनी साधारण 20 वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या एका क्लिनिकल ट्रायल डेटाचं विश्लेषण करताना सांगितलं. रिसर्चमध्ये सोडियमचं अधिक सेवन केल्याने आतड्यांवर सूज आढळली. त्यासोबतच जास्त फायबर असलेला आहार घेणाऱ्या लोकांमध्ये कमी फायबर असलेला आहार घेणाऱ्यांच्या तुलनेत आतड्यांवर अधिक सूज आढळली.
आतड्यांमध्ये सूज येण्याचं कारण - रिसर्चमधून समोर आलं आहे की, अमेरिकेतील साधारण एक तृतियांश लोकसंख्या आतड्यांवर सूज येण्याच्या समस्येचा सामना करत आहे. पोटात तयार होणारा गॅस हे याचं कारण सांगण्यात आलं आहे. त्यांनी सांगितले की, गॅस फायबरला पचवणाऱ्या बॅक्टेरियामुळे तयार होतो. अभ्यासकांनी सांगितले की, फायबर असलेल्या पदार्थांमध्ये मिठाचं प्रमाण वाढल्याने गॅसची समस्या वाढते. त्यामुळे अधिक फायबर असलेल्या आहारात मिठाचं प्रमाण कमी असलं पाहिजे.
काय कराल उपाय? - 1) भरपूर पाणी पिणं आणि हाइड्रेटेड राहणं पचन नियंत्रित करण्याची एक सोपी पद्धत आहे. कोमट पाणी पिणं पचनासाठी चांगलं मानलं जातं. त्याशिवाय कलिंगड, टोमॅटो, सलाद, ओवा आणि फळं-हिरव्या भाज्या फायदेशीर ठरतात.
2) फायबर हे एक आवश्यक मॅक्रोन्यूट्रिएंट आहे. फायबर फळं, हिरव्या भाज्या, कडधान्य, बीया आणि इतर अनेक गोष्टींमध्ये आढळतं. यांचा आहारात समावेश करा.
3) आतड्या साफ करण्यासाठी ज्यूस सगळ्यात सोपी पद्धत मानली जाते. यात फळं आणि भाज्यांचा ज्यूसचा समावेश आहे. आलं, लसूण आणि लाल मिरच्या सारख्या जडीबुटींमध्ये फायटोकेमिकल्स असतात. असं म्हणतात की, यांच्या सेवनाने बॅड बॅक्टेरिया नष्ट होतात.
4) सायलियम, एलोवेरा, मार्शमॅलो रूट आणि स्लिपरी एल्म सारख्या जडीबुटी बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करतात. या जडीबुटींचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
आतड्यांमध्ये गडबड असण्याचे संकेत - आयुर्वेद डॉ. दीक्षा यांनी सांगितलं की, कशाप्रकारे आतड्यांचं आरोग्य महत्वाचं आहे. आतड्या केवळ अन्न पचन करत नाही तर आपल्या भावनांना प्रोसेस करून शरीराच्या इतर अवयवांची देखभाल करतात. इतकंच नाही तर त्या सांगतात की, आतड्यांचं आरोग्य चांगलं नसलं तर हेच सर्व आजारांचं मूळ कारण ठरतं.
डॉक्टरांनुसार, चिंतेपासून ते तणावापर्यंत, पुरेसं जेवण न करणे आणि व्यायाम कमी करणे याने आरोग्य बिघडतं. भूकेपेक्षा जास्त जेवण आणि जेवणाच्या वेळेत अनियमितता, पौष्टिक आहार न घेणं याने पचनक्रिया बिघडते. त्यासोबतच उपवास ठेवल्याने किंवा उपाशी राहिल्याने आतड्यांवर वाईट प्रभाव पडतो.
डॉक्टरांचं असं मत आहे की, स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी खाताना फक्त खा आणि खेळताना फक्त खेळा हा नियम फॉलो केला पाहिजे. डॉ. दीक्षा यांनी आतड्यांमध्ये काही गडबड झाली तर कोणती लक्षणे दिसतात याबाबत सांगितलं आहे.
जर एखाद्या व्यक्तीच्या पोटात सतत जडपणा किंवा पोट फुगल्यासारखं वाटत असेल, जुलाब किंवा दिवसातून दोनपेक्षा जास्त वेळा टॉयलेटला जात असाल, तोंडाची स्वच्छता करूनही श्वासांची दुर्गंधी येत असेल तर याचा अर्थ असा आहे की, आतड्यांमध्ये समस्या आहे.
जर तुम्हाला एनर्जेटीक वाटत नसेल किंवा सतत थकवा जाणवत असेल तर कुठे ना कुठे याला तुमच्या आतड्या जबाबदार आहेत. त्यासोबतच अनियमित पिरियड्स, एक्ने म्हणजे पिंपल्स किंवा त्वचेसंबंधी काही समस्या असेल तर यालाही आतड्यांचं बिघडलेलं आरोग्य कारणीभूत असू शकतं.
डॉ. भावसार सांगतात की, निरोगी आतड्यांमधून तुम्हाला, हॅपी हार्मोन, कमी तणाव, पोषक तत्व, चांगली झोप, चांगली स्मरणशक्ती, चमकदार त्वचा, चमकदार केस, निरोगी आतड्या या सर्व गोष्टी मिळतील. त्या सांगतात की, तुम्हाला तुमच्या लाइफस्टाईलमध्ये बदल करण्याची गरज आहे. यात खाण्याची सवय, झोपण्याची पद्धत, व्यायाम, तणावापासून दूर राहणे यांचा समावेश आहे. आपल्या आतड्या निरोगी आणि फिट ठेवण्यासाठी बस इतकंच करायचं आहे.